मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचा मृतदेह (Sidharth Shukla Died) कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता हे सांगणं कठीण आहे की त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल आणि पोस्ट मार्टम अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. (फोटो सौजन्य-Manav Manglani)