• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sidharth Shukla चं अध्यात्माशी होतं जवळचं नातं, आज या परंपरेनुसार होणार अंत्यसंस्कार

Sidharth Shukla चं अध्यात्माशी होतं जवळचं नातं, आज या परंपरेनुसार होणार अंत्यसंस्कार

आज मुंबईतील ओशिवारा याठिकाणी सिद्धार्थवर अंत्यसंस्कार (Sidharth Shukla Funeral) होणार आहेत. अभिनेत्यावर अंत्यसंस्कार ब्रह्मकुमारी परंपरेनुसार (Sidharth Shukla Funeral from Brahmakumari Rituals) होणार आहेत.

 • Share this:

  मुंबई, 03 सप्टेंबर: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू  (Sidharth Shukla) ही घटना अजूनही अनेकांसाठी विश्वास न ठेवण्यासारखी आहे. या घटनेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. वयाच्या अवघ्या 40 वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला, त्याने अशावेळी जगाला अलविदा केलं जेव्हा त्याने 'नेम आणि फेम' दोन्ही मिळण्यास सुरुवात झाली होती. आज मुंबईतील ओशिवारा याठिकाणी सिद्धार्थवर अंत्यसंस्कार (Sidharth Shukla Funeral) होणार आहेत. अभिनेत्यावर अंत्यसंस्कार ब्रह्मकुमारी परंपरेनुसार (Sidharth Shukla Funeral from Brahmakumari Rituals) होणार आहेत. सिद्धार्थचा अध्यात्मावर विश्वास होता, याच कारणामुळे तो दीर्घकाळापासून ब्रह्मकुमारी संस्थानाशी जोडलेला होता. सिद्धार्थ शुक्लाची आई रीता शुक्ला गेल्या काही काळापासून ब्रह्मकुमारी संस्थानाशी संबंधित आहे. त्या राजयोग ध्यानाकरता माउंट अबू याठिकाणीही जात असत. सिद्धार्थ देखील त्यावेळी त्याच्या आईसह ब्रह्मकुमारी सेंटरवर नेहमी जात-येत असे. त्यामुळे त्याचं अध्यात्माशी जुनं नातं आहे.

  हे वाचा-सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ‘बालिका वधू’ मालिकेचा हा एपिसोड का होतोय व्हायरल? मीडिया अहवालानुसार, केवळ माउंट अबूच नाही तर मुंबईतील ब्रह्मकुमारी संस्थानच्या केंद्रांना देखील सिद्धार्थ भेट देत असे. योगाभ्यासामध्ये त्याला विशेष आवड होती, शिवाय एकांतात राहण्याचीही त्याला आवड होती. दरम्यान संस्थान प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांनी शोकसंदेश पाठवून सिद्धार्थच्या आत्माच्या शांतीसाठी प्रार्थना केली आहे. तसंच त्याच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हे वाचा-सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर; मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla Death) गुरूवारी सकाळी मुंबईत अकाली निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यावर शोक व्यक्त केला. सिद्धार्थच्या जवळच्या मित्र मैत्रिणींनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. बॉलिवूड तसंच टीव्ही कलाकारांनी सिद्धार्थच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.

  Published by:Janhavi Bhatkar
  First published: