• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Sidharth Shukla च्या निधनानंतर ‘बालिका वधू’ मालिकेचा हा एपिसोड का होतोय व्हायरल?

Sidharth Shukla च्या निधनानंतर ‘बालिका वधू’ मालिकेचा हा एपिसोड का होतोय व्हायरल?

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मालिकेतील एक प्रसंग असलेला व्हिडिओ कुणीतरी शेअर केला आणि तो व्हायरल व्हायला लागला. हा बालिका वधू (Balika Vadhu) या हिंदी टीव्ही मालिकेचा 1157 वा भाग आहे.

  • Share this:
मुंबई 03 सप्टेंबर : देशातील अनेक तरुण-तरुणी हिंदी चित्रपट, टीव्हीवर हिरो किंवा हिरोइन होण्यासाठी किंवा आपली ओळख निर्माण करण्यासाठी मायापुरी मुंबई (Mumbai) नगरात दाखल होतात. त्यांना अशी उंची गाठायची इच्छा असते की जिथं पोहोचल्यावर त्यांच्या मूळ गावातील लोक त्यांचं कौतुक करतील. अनेकांना हे साध्य होतं पण अनेकजण आयुष्यभर छोट्या-मोठ्या भूमिका करत असतात. संघर्ष करत असतात. हजारो ऑडिशन्स (Auditions) देतात आणि एक दिवस त्यांचं ध्येय पूर्ण करतात. अशाच तरुणांपैकी एक असलेला तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचं गुरुवारी निधन झालं. तो 40 वर्षांचा होता. एवढ्या कमी वयात त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण बॉलिवूड हळहळलं. बिग बॉस 13 चा (Bigg Boss 13 Winner) विजेता ठरलेल्या सिद्धार्थला सोशल मीडियामध्येही भरपूर फॅन फॉलोइंग आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी पसरताच लोकांनी त्याला श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली. दबंग सलमान खान, माधुरी दीक्षित (Salman Khan, Madhuri Dixit) यांच्यासारख्या दिग्गजांपासून नवोदित कलाकारांनीही त्याला श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली. याचबरोबर त्याच्याबद्दल गुगल सर्चही वाढले आणि सिद्धार्थने शिवची भूमिका साकारलेल्या बालिका वधू (Balika Vadhu Viral Episode) या हिंदी टीव्ही मालिकेचा 1157 वा भागही सगळीकडे व्हायरल व्हायला लागला. याबाबतचं वृत्त नवभारत टाइम्सनं दिलं आहे. सिद्धार्थचा मृत्यू अटॅकमुळे होऊ शकत नाही, जिम ट्रेनरच्या दाव्यामुळे नवा ट्विस्ट सिद्धार्थचं कमी वयात निधन झाल्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यामुळे नेटिझन्सनी गुगलवर ‘सिद्धार्थ शुक्ला परिवार’, ‘सिद्धार्थ शुक्ला विवाह’, ‘सिद्धार्थ शुक्लाची बायको’, ‘सिद्धार्थ शुक्लाच्या लग्नाची तारीख’ असं सर्च करायला सुरुवात केली. त्यामुळे सिद्धार्थ शुक्लाच्या मालिकेतील एक प्रसंग असलेला व्हिडिओ कुणीतरी शेअर केला आणि तो व्हायरल व्हायला लागला. बालिका वधू (Balika Vadhu) या हिंदी टीव्ही मालिकेचा 1157 वा भाग आहे ज्यात शिवची भूमिका साकारणारा सिद्धार्थ आणि आनंदीची भूमिका साकारणारी प्रत्युषा बॅनर्जी यांच्या लग्नाचा प्रसंग चित्रित केला आहे. यात हे दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोमँटिक हसताना दिसत आहेत. तसंच आनंदी शिवला ‘कलेक्टर साहेब’ अशी हाक मारतानाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. Sidharth Shukla होतं नशेचं व्यसन; 2 वर्षे Rehab Centre मध्ये होता एक वाईट गोष्ट म्हणजे बालिका वधू (Balika Vadhu) या हिंदी टीव्ही मालिकेत आनंदीची भूमिका साकारलेल्या प्रत्युषा बॅनर्जीनेही 2016 मध्ये आत्महत्या केली होती. आता सिद्धार्थचा अचानक मृत्यू झाला आहे. याच मालिकेत दादी सा ही भूमिका साकरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचं वयाच्या 75 व्या वर्षी जुलै 2021 मध्ये निधन झालं आहे. त्यामुळे आता या मालिकेत काम केलेले तीन महत्त्वाच्या कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे.
First published: