Home /News /entertainment /

Sushant Death Case नंतर मुंबई पोलीस सावध, Sidharth Shukla च्या मृत्यू प्रकरणात घेतला मोठा निर्णय

Sushant Death Case नंतर मुंबई पोलीस सावध, Sidharth Shukla च्या मृत्यू प्रकरणात घेतला मोठा निर्णय

मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे की सिद्धार्थच्या मृतदेहाचे शव विच्छेदन होईल. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातून (Sushant Singh Rajput Death Case) धडा घेत मुंबई पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टमची व्हिडीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 02 सप्टेंबर: बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla) आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Actor Sidharth Shukla Death) याच्या अकाली जाण्याने मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घतला आहे. सिद्धार्थचा मृतदेह मुबईतील कूपर रुग्णालयात असून पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणात एक मोठं अपडेट समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे की सिद्धार्थच्या मृतदेहाचे शव विच्छेदन होईल. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातून (Sushant Singh Rajput Death Case) धडा घेत मुंबई पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टमची व्हिडीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या अशा अचानक जाण्याने चाहते, त्याचे सहकलाकार, कुटुंबीय सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा सस्पेन्स कायम असतानाच पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सिद्धार्थच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केला नाही आहे. त्याच्या मृत्यूबाबत कोणतीही शंका किंवा संशयास्पद मृत्यू झाला असावा असं कुटुंबातील कोणत्याही सदस्याने म्हटलेलं नाही आहे. सिद्धार्थ कोणत्याही मानसिक तणावाखाली देखील नव्हता, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे. असे असूनही मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात विशेष खबरदारी बाळगण्यात येत आहे. हे वाचा- Sidharth Shukla च्या टीमकडून आली पहिली Reaction, 'प्लीज एवढं करा...' एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सची एक विशेष टीम करेल. रुग्णालयातून मिळालेल्या रेकॉर्डच्या आधारे, अशी माहिती मिळते आहे की पोस्ट मॉर्टम रुममध्ये आधीपासून काही मृतदेह आहेत. यापैकी दोन मृतदेह decomposed झाले आहेत, तर अन्य चार मृतदेहांचे पोस्ट मॉर्टम होणे बाकी आहे. अशी शक्यता आहे की या पोस्ट मॉर्टमनंतर सिद्धार्थच्या मृतदेहाच्या पोस्ट मॉर्टमची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हे वाचा-Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे 5 अपडेट ओशिवारा पोलिसांची टीम सिद्धार्थच्या घरी पोहोचली आहे. ओशिवारा पोलिसांकडूनच या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात आहे. या अंतर्गत पंचनामा केला जाईल, शिवाय सिद्धार्थच्या जवळच्या व्यक्तींचा जबाब देखील नोंदवण्यात येणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Heart Attack, Mumbai police, Siddharth shukla

    पुढील बातम्या