मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बायकोला पुरस्कार मिळताच सिद्धार्थने स्टेजवर धावत जात केलं असं काही; VIDEO व्हायरल

बायकोला पुरस्कार मिळताच सिद्धार्थने स्टेजवर धावत जात केलं असं काही; VIDEO व्हायरल

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी

शाही लग्न आणि भव्य रिसेप्शन नंतर काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेऊन आता दोघेही कामावर परतले आहेत. नुकतंच दोघांनीही एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. तेथील दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 फेब्रुवारी:  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे आजकाल सोशल मीडिया सेन्सेशन बनले आहेत. ते कुठेही गेले तरी कॅमेऱ्याच्या नजरा त्यांच्यावर असतात. अलीकडेच 7 फेब्रुवारीला दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे, संगीत आणि हळदी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी तर इंस्टाग्रामवर रेकॉर्डब्रेक लाईक्स मिळवले. शाही लग्न आणि भव्य रिसेप्शन नंतर काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेऊन आता दोघेही कामावर परतले आहेत. नुकतंच दोघांनीही एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. तेथील दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवविवाहित जोडपं सिद्धार्थ आणि कियारा लग्नानंतर पहिल्यांदाच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचले होते. बॉलीवूडच्या या देखण्या जोडप्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. यावेळी कियारा सुंदर पिवळ्या रंगाच्या साडीत पोहोचली तर करड्या आणि काळ्या रंगाच्या सूटमध्ये सिद्धार्थ शोभून दिसत होता.  लग्नानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात पोहोचले होते. मात्र, यावेळी सिद्धार्थ आणि कियारा वेगळे पोहोचले होते. यावेळी दोघांच्या स्टाइलवर चाहते फिदा झाले आहेत. आता या सोहळ्यातील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sacchin Shroff Wedding: दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले नवे तारक मेहता; अंजलीसह बबिताजींनी लावली खास हजेरी

न्यूज 18 च्या या पुरस्कार सोहळ्यात कियाराला स्टार ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्डसाठी कियाराचं नाव पुकारताच सिद्धार्थला खूप आनंद झाला. कियाराने स्टेजवर जात पुरस्कार स्वीकारला. पण त्यानंतर जे झालं त्यामुळे या दोघांचे चाहते सध्या भलतेच खुश आहेत. बायकोला पुरस्कार मिळताच न राहवून सिद्धार्थने धावतच स्टेजवर जात तिला मिठी मारली. दोघांचं एकमेकांवरील प्रेम पाहून चाहते दोघांचं कौतुक करत आहे.

जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न

7 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराने जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केले होते. या लग्नात कुटुंबीय आणि नातेवाईकांव्यतिरिक्त बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिद्धार्थ आणि कियाराने लग्नाच्या अनेक झलक सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये लग्नाआधीपासून ते लग्नापर्यंत अनेक सुंदर फोटोंचा समावेश आहेत.

आता लग्नानंतर हे जोडपं पुन्हा कामावर परतलं असून दोघांनाही मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना इच्छा आहे. दोघांचा वर्कफ्रंट  विषयी सांगायचं तर येणाऱ्या काळात सिद्धार्थ रोहित शेट्टीच्या 'द इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकरणार आहे तसेच तो 'योद्धा' या सिनेमात देखील झळकणार आहे. तर कियारा रामचरण सोबत एका मोठ्या पॅन इंडिया चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Kiara advani, Sidharth Malhotra