सिद्धार्थ कियाराच्या लग्नाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर ७ फेब्रुवारीला दोघांनी लग्नगाठ बांधली.
या दोघांच्या लग्नाला काही खास मंडळीच फक्त आमंत्रित होती. त्यामुळे या दोघांनी बॉलिवूडच्या कलाकारांसाठी काल मुंबईत खास रिसेप्शन ठेवलं होतं.
सिद्धार्थ कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया भट्ट सासू नितु कपूर यांच्यासोबत आली होती. यावेळी तिने काही पोज देखील दिल्या.
सिद्धार्थ कियाराच्या रिसेप्शनमध्ये या दोघांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. सिद्धार्थचे आई वडील, भाऊ वहिनी तर कियाराचे आई वडील आणि भावाने मीडियाला विशेष पोज दिल्या.