जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कशी कराल नैराश्येवर मात? सिद्धार्थ चांदेकरनं सांगितला सोपा उपाय

कशी कराल नैराश्येवर मात? सिद्धार्थ चांदेकरनं सांगितला सोपा उपाय

कशी कराल नैराश्येवर मात? सिद्धार्थ चांदेकरनं सांगितला सोपा उपाय

‘उत्तर मिळेपर्यंत त्याला सोडू नकोस’; सिद्धार्थ चांदेकरचा हा लक्षवेधी उपाय एकदा पाहाच

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 22 जुलै**:** सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गेली दोन दशकं तो सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. देशभरातील घडामोडिंवर तो रोखठोकपणे प्रतिक्रिया देताना दिसतो. यावेळी त्याने नैराश्य (Depression) या विषयावर भाष्य केलं आहे. लॉकडाउनमुळे हा विषय देखील सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धार्थची पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “तुला काय हवंय? हा प्रश्न स्वत:ला विचारल्यावर काय उत्तर येतं? कुणाचा आवाज ऐकू येतो? तुझाच? की त्यांचा? त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा, आणि त्यांच्या इच्छा आरडा ओरडा करू लागतात? का हाताची घडी घालून उभा असलेल्या तुझा आवाज घुमतो तुझ्या कानात? त्यांना जरा बाहेर काढून दार लावशील? आणि आरशात बघशील एकदा? असं म्हणतात की स्वत:चा आवाज डोळ्यातून दिसतो. टक लावून बघू शकतोस स्वत:कडे? नक्की काय हवंय? काय होतंय? पण मग परत विचार काय हवंय? उत्तर मिळेपर्यंत सोडू नकोस.” अशी इन्स्टाग्राम पोस्ट लिहून सिद्धार्थने नैराश्येवर भाष्य केलं. सविता मालपेकर यांची सोनसाखळी गेली चोरीला; 24 तासांत पोलिसांनी शोधले चोर

जाहिरात

मराठमोळ्या अभिनेत्रीनं खाल्ला होता झाडूनं मार; ऐका बालपणीचा धम्माल किस्सा सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणाला,  “खरंच दुसऱ्यांचा विचार करता करता स्वतःला काय हवं आहे हे विसरूनच जातो आपण” अजून एक युजरने कमेंट केली की “सुंदर अप्रतिम लेख सिद्धार्थ चांदेकर, हे मनोगत सांगितल्या बद्दल थॅंकयू.” सिद्धार्थने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंण्ड होताना दिसत आहे. तसेच या पोस्टवर लाइक्स देखील मिळताना दिसले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात