मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सविता मालपेकर यांची सोनसाखळी गेली चोरीला; 24 तासांत पोलिसांनी शोधले चोर

सविता मालपेकर यांची सोनसाखळी गेली चोरीला; 24 तासांत पोलिसांनी शोधले चोर

24 तासांच्या आत त्या भूरट्या चोराला पकडलं. (Savita Malpekar thanks Mumbai police) चोराला पकडल्याबद्दल सविता मालपेकर यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 जुलै: जेष्ठ मराठी अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेली होती. दादरमधील शिवाजी पार्क येथे चालत असताना एका चोराने त्यांची चैन खेचली. हा धक्कादायक प्रकार रात्री नऊच्या सुमारास गेट क्रमांक 5 वर घडला होता. त्यानंतर सविता यांनी त्वरीत पोलीस स्टेशन गाठलं अन् याबाबत तक्रार केली. (Mumbai Police) समाधानाची बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी देखील त्वरीत तपासाची चक्र फिरवली, अन् 24 तासांच्या आत त्या भूरट्या चोराला पकडलं. (Savita Malpekar thanks Mumbai police) चोराला पकडल्याबद्दल सविता मालपेकर यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

मराठमोळ्या अभिनेत्रीनं खाल्ला होता झाडूनं मार; ऐका बालपणीचा धम्माल किस्सा

काय घडलं नेमकं होतं?

शिवाजी पार्कमध्ये फेरी मारून झाल्यानंतर त्या कट्ट्यावर आराम करत बसल्या होत्या. तेवढ्यात एका व्यक्तीनं त्यांना वेळ विचारली. हातात घड्याळ नसल्यामुळे त्या काही त्याला वेळ सांगू शकल्या नाही. परंतु त्याच्यासोबत संभाषण करत असतानाच एक व्यक्ती बाईकवरून आला अन् त्यांची चैन हिसकावून पळून गेला.

अरररर.. खतरनाक… मनसेच्या दहीहंडीला प्रविण तरडे नाचणार

या घटनेनंतर पाच मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटली तो माहीमचा निवासी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांकडं नोंदवलेल्या जबाबानुसार या सोनसाखळीच्या किंमत साधारण एक लाख 20 हजार असून, ती 30 ग्रॅम वजनाची आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत घडलेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला. या प्रकरणी सविता मालपेकर यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. व त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक देखील केलं आहे.

First published:

Tags: Crime, Marathi actress, Mumbai police