मराठमोळ्या अभिनेत्रीनं खाल्ला होता झाडूनं मार; ऐका बालपणीचा धम्माल किस्सा

आपल्या आयुष्यातील एक थक्क करणारा किस्सा सांगितला. (Prajakta Mali video viral) लिखाणाच्या आवडीमुळे तिला आईचा झाडूने मार खावा लागला होता. पाहुया काय होता तो प्रसंग…

आपल्या आयुष्यातील एक थक्क करणारा किस्सा सांगितला. (Prajakta Mali video viral) लिखाणाच्या आवडीमुळे तिला आईचा झाडूने मार खावा लागला होता. पाहुया काय होता तो प्रसंग…

  • Share this:
    मुंबई 22 जुलै: प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गेली दोन दशकं ती सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान अभिनयासोबतच प्राजक्तानं आता आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. (Prajakta mali movie) तिने स्वत:चा काव्यसंग्रह प्रकाशित केला. या प्रकाशनसोहळ्याच्या वेळी तिने आपल्या आयुष्यातील एक थक्क करणारा किस्सा सांगितला. (Prajakta Mali video viral) लिखाणाच्या आवडीमुळे तिला आईचा झाडूने मार खावा लागला होता. पाहुया काय होता तो प्रसंग… प्राजक्ताच्या या काव्यसंग्रहाचं नाव ‘प्राजक्तप्रभा’ असं आहे. मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा प्रकाशनसोहळा पार पडला. यावेळी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल सांगताना तिने एक चकित करणारा किस्सा सांगितला. त्यावेळी प्राजक्ता 11 वीत होती. लहानपणापासूनच तिला लिहिण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे ती रोजनिशी लिहायची. दरम्यान तिची एक डायरी आईच्या हातात लागली. त्यामधील काही गोष्टी वाचून आई इतकी संतापली की तिने प्राजक्ताला चक्क झाडूने चोप दिला होता. या प्रकारानंतर प्राजक्तानं रोजनिशी लिहिणं थांबवलं. किमान कुलूपबंद कपाट मिळेपर्यंत रोजनिशी लिहायची नाही असा जणू तिने निर्धारच केला होता. हा किस्सा सांगताना प्राजक्ताला हसू आवरत नव्हतं. अरररर.. खतरनाक… मनसेच्या दहीहंडीला प्रविण तरडे नाचणार
    ‘पती करतो porn आणि पत्नी yoga’; Hungama 2 मधील गाण्यामुळे Shilpa Shetty troll प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘जुळून येती रेशिम गाठी’, ‘नकटिच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमध्ये काम केलं. ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या ‘मेघा देसाई’ या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला ‘खो-खो’, ‘संघर्ष’, ‘हंपी’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published: