मुंबई, 10 मे : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीनं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. आज ती टीव्ही इंडस्ट्रीमधली एक यशस्वी अभिनेत्री मानली जाते. श्वेतासाठी हे सर्व अजिबात सोपं नव्हतं कारण रिल लाइफपेक्षा रिअल लाइफमध्ये तिनं बरेच उतार चढाव पाहिले आहेत. पण यातून तिनं स्वतःला सिद्ध केलं आणि सर्वांना दाखवून दिलं की ती एक सक्षम महिला आहे. श्वेता तिवारी तिचा दुसरा पती अभिनव कोहलीपासून वेगळी झाली. खरं तर ती तिच्या पर्सनल लाइफबद्दल फारसं बोलताना दिसत नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं दुसऱ्या घटस्फोटानंतर तिच्यावर काय परिस्थिती आली आणि त्याचा तिनं कसा सामना केला याविषयी सांगितलं. यावेळी पहिल्यांदा तिच्या आयुष्यातली सल तिनं बोलून दाखवली.
पती अभिनव कोहलीपासून वेगळं होण्याबाबत पिंकव्हिलाशी बोलताना श्वेता म्हणाली, मी घरात एकटी कमावणारी आहे त्यामुळे मी डिप्रेस होऊ शकत नाही. माझ्याकडे तसंही माझ्या दुसऱ्या घटस्फोटाबाबत विचार करू, दुःख करत बसू किंवा चिंता करत बसू एवढा वेळ नाही. माझं जीवनातला हा सध्याचा सर्वात कठीण काळ आहे आणि मलाच याची काळजी घ्यावी लागणार आहे.
अभिनेत्याला पत्नीनं दिली थेट घरातून हाकलून देण्याची धमकी, पाहा नेमकं काय घडलं
श्वेता पुढे म्हणाली, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. अनेक लोकांची मला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मी स्ट्रेस किंवा दुःखात राहू शकत नाही. माझी मुलगी माझा मुलगा आणि माझ्या संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे आणि घरात कमावणारी मी एकटी आहे. माझ्या घरात पुरूष आणि स्त्री दोन्ही मीच आहे. अर्थात माझ्या या कठीण काळात माझ्या मुलीनं मला पूर्ण साथ दिली आहे. श्वेताची मुलगी पलक सांगते, माझी आई खूपच मजबूत स्त्री आहे. फक्त तिचं नाही तर तिच्यासारख्या कोणत्याही महिलेला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. पण मी माझ्या आईसाठी ती प्रत्येक गोष्ट करणार आहे जे करणं माझ्यासाठी शक्य आहे.
कोरोना योद्धे आहेत 'पाठकबाईं'चे आई-वडील; अक्षया देवधरबरोबर दिलखुलास गप्पा
View this post on Instagram
श्वेता तिवारीनं आधी भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केलं होतं. त्याच्यापासून तिला एक मुलगी आहे. पण मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते दोघं वेगळे झाले. त्यानंतर ती अभिनव कोहलीच्या प्रेमात पडली. पण तिचं दुसरं लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण करणारी श्वेता सध्या दोन मुलांची आई आहे आणि आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ ती एकटीच करते.
सलमान खान लवकरच चढणार बोहल्यावर? लग्नाबाबत गर्लफ्रेंड युलिया वंतूर म्हणते...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shweta, Tv actress