सलमान खान लवकरच चढणार बोहल्यावर? लग्नाबाबत गर्लफ्रेंड युलिया वंतूर म्हणते...

सलमान खान लवकरच चढणार बोहल्यावर? लग्नाबाबत गर्लफ्रेंड युलिया वंतूर म्हणते...

सलमान खान मागच्या काही काळापासून मॉडेल आणि अभिनेत्री युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : सलमान खानच्या लग्नाची चर्चा तर बॉलिवूडमध्ये नेहमीच होताना दिसते. पण जेव्हाही सलमानला त्याच्या लग्नाबाबत कोणताही प्रश्न विचारला जातो त्यावेळी तो हा प्रश्न टाळताना दिसून येतो. सलमान खान मागच्या काही काळापासून मॉडेल आणि अभिनेत्री युलिया वंतुरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दरम्यान एका मुलाखतीत युलियाला सलमान खानशी लग्नाबाबत काय प्लान आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नेहमी मौन बाळगणाऱ्या युलियानं यावर अखेर उत्तर दिलं आहे.

युलियानं नुकतीच एका वेबसाइटला मुलाखत दिली. ज्यात तिला सलमानसोबत लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आलं. यावर युलिया म्हणाली, जीवनात आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. लग्न झालं आहे किंवा नाही याने मला काही फरक पडत नाही. हा प्रश्न मला लगातार विचारला जात आहे. पण जर दोन व्यक्ती एकमेकांसोबत वेळ घालवून जर आनंदी असतील तर त्यांना आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे. एक वेळ अशी होती की, माझ्या आई-वडीलांनी सुद्धा हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला होता. शेवटी कंटाळून मी त्यांना विचारलं तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे मी आनंदी आहे हे की मी लग्न करणं.

VIDEO: शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं जोरदार भांडण, रागाच्या भरात चांगलंच सुनावलं

युलियाच्या बोलण्यातून ही गोष्ट तर स्पष्ट आहे की, सध्या तरी सलमान आणि तिचा लग्नाचा कोणताही प्लान नाही. सध्या युलिया सलमानच्या पनवेल फार्म हाऊसवर अडकलेली आहे. लॉकडाऊनमुळे तिला मुंबईला परतणं शक्य नाही. काही दिवसांपूर्वी तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती घोडस्वारी करताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Iulia Vantur (@vanturiulia) on

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा राधे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचं शूटिंग थांबलं आहे. अशात सलमान खानच्या राधे सिनेमाचं शूटिंग सुद्धा थांबवण्यात आलं आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

करण जोहरचा असा अपमान आतापर्यंत कोणीच केला नसेल, जेव्हा खास व्यक्तीच म्हणते...

नेहमीच मेकअपशिवाय राहते ही अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात

First published: May 9, 2020, 4:35 PM IST

ताज्या बातम्या