मुंबई, 10 मे : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे सध्या अनेक कलाकार शूटिंग थांबल्यानं घरी बसले आहेत. त्यामुळे सर्व कलाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय झाले आहेत. लाइव्ह चॅट किंवा फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून हे सर्वजण आपल्या चाहच्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अशात अभिनेता जय भानुशाली याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्याची पत्नी त्याच्यावर खूपच रागावलेली दिसत आहे. जयची पत्नी माही विजनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात पिझ्झा खाताना दिसत आहे आणि सांगत आहे की माझ्या नवऱ्याला वाटतं की हा सर्वांत वाईट पिझ्झा आहे आणि मी रोज काही तरी नवीन नवीन डिश तयार करुन रोज खाऊ घालते. नेहमीप्रमाणे तो त्यात काही ना काही प्रॉब्लेम शोधतोच. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती जयला बोलताना दिसते की, काही करता तर येत नाही 10 पैकी झीरो देईन. कोरोना व्हायरस नसता ना तर तुला घरातून बाहेरच काढलं असतं.
माहीला रागावलेलं पाहताच जय भानुशाली तिनं लावलेले आरोप खोटे असल्याचं सांगत हसू लागतो. माही आणि जयचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. त्यांच्या या केमिस्ट्रीला सर्वजण परफेक्ट कपल गोल्स म्हणताना दिसत आहे. तर काहींनी माही आणि जयचं हे भांडण क्यूट असल्याच मत व्यक्त केलं आहे. माही विज इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचा नवरा आणि मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. याशिवाय ट्रोलर्सना अनेकदा सडेतोड उत्तर दिल्यानंही माही चर्चेत असते.

)







