OMG! लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट

OMG! लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट

ही अभिनेत्री मागच्याच वर्षी डिसेंबरमध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकली होती.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : बॉलिवूड असो वा टीव्ही कलाकार. या इंडस्ट्रीमध्ये नवी नाती तयार व्हायला किंवा जुनी नाती संपायला वेळ लागत नाही आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिने काही दिवसांपूर्वीच एक मोठी घोषणा केली होती. श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ती पती रोहित मित्तल याच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता तिनं एका मुलाखतीत याला दुजोरा दिला आहे.

श्वेता बासू प्रसादनं ‘मकडी’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. तिचा पती रोहित हा निर्माता असून श्वेता आणि रोहित मागच्याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. मात्र आता हे दोघंही एकमेकांच्या संमतीनं वेगळे होत असल्याचं श्वेतानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये श्वेतानं घटस्फोटाचं कारण सांगतानाच रोहित मित्तलनं तिला नेहमीच प्रेरित केल्याबद्दल अनेक गोड आठवणी दिल्याबद्दल त्याचे आभारही मानले आहेत.

ऑफिसपासून बेडरुमपर्यंत हिना खानची सर्व वैयक्तिक माहिती झाली इंटरनेटवर Leak?

View this post on Instagram

A post shared by Shweta Basu Prasad (@shwetabasuprasad11) on

अभिनेत्री श्वेता बासू प्रसादनं लिहिलं, रोहित मित्तल आणि मी एकमेकांच्या संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिने विचार करुन आणि एकमेकांचं हित लक्षात घेऊन आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत.

आलिया भटच्या आईचं वादग्रस्त विधान, अफजल गुरुला म्हटलं ‘बळीचा बकरा’

तिनं पुढे लिहिलं, प्रत्येक पुस्तक वाचणं शक्य नसतं याचा अर्थ असा नाही की ते पुस्तक खराब आहे किंवा ते कोणी वाचणारच नाही. काही गोष्ट अपूर्ण सोडणंच हिताचं असतं. यानंतर आता काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखातीत तिनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे हे कपल लवकरच ऑफिशिअली वेगळे होणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Filmmaker-Autohead-Megalopolis (@rohitmittal2607) on

श्वेता आणि रोहित 6 वर्षांपूर्वी एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि त्यानंतर एक ट्रीपच्या दरम्यान या दोघांनी साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत श्वेतानं फॅन्टम फिल्मच्या दरम्यान दोघांमधील जवळीक वाढल्याचं सांगितलं होतं.

'फुरसत से आया है झुंड रे...', बिग बींचा बहुचर्चित Jhund Teaser रिलीज

First published: January 21, 2020, 5:45 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या