ऑफिसपासून बेडरुमपर्यंत हिना खानची सर्व वैयक्तिक माहिती झाली इंटरनेटवर Leak?

ऑफिसपासून बेडरुमपर्यंत हिना खानची सर्व वैयक्तिक माहिती झाली इंटरनेटवर Leak?

हिना खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ पासून ते बिग बॉस पर्यंत यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री हिना खान लवकरच बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला. पण हिना बद्दल नुकतीच खळबळ माहिती समोर आली आहे. हिनाच्या ऑफिसपासून ते बेडरुमपर्यंतची सर्व माहिती सोशल मीडियावर लीक झाली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हिना खान लवकरच हॅक या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिचा हा सिनेमा सायबर क्राइमच्या कथेवर आधारित आहे. या सिनेमात हिना खान प्रमुख भूमिकेत दिसणार असून तिच्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलाज झाला आहे ज्यात तिची सर्व पर्सनल माहिती इंटरनेचवर लीक झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाची पूर्ण कथा ही 19 वर्षीय हॅकर आणि हिना खान यांच्या भोवती फिरते.

'फुरसत से आया है झुंड रे...', बिग बींचा बहुचर्चित Jhund Teaser रिलीज

हा हॅकर मुलगा समीरा(हिना खान)वर खूप प्रेम करत असतो. पण तिनं त्याला नकार दिल्यानं तो बिथरतो आणि रागाच्या भरात तिचे सर्व सोशल मीडिया अकाउंट हॅक करतो. ज्यामुळे तिची सर्व पर्सनल माहिती सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यानंतर हळूहळू तो तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. ज्यामुळे समीराला खूप त्रास सहन करावा लागतो. सिनेमातील 19 वर्षीय हॅकर तरुणाची भूमिका युट्यूब स्टार रोहन शाहनं साकारली आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि हॅकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच इंटरनेटवर कोणतीही गोष्ट शेअर करताना कोणाही तुमचा डेटा हॅक करु शकतो हे विसरता नये हा संदेश देण्यात आला आहे. हा सिनेमा येत्या 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

VIDEO : साराच्या ‘आदाब’ला सलमान खाननं दिलेली प्रतिक्रिया पाहून व्हाल हैराण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2020 03:54 PM IST

ताज्या बातम्या