'फुरसत से आया है झुंड रे...', बिग बींचा बहुचर्चित Jhund Teaser रिलीज

'फुरसत से आया है झुंड रे...', बिग बींचा बहुचर्चित Jhund Teaser  रिलीज

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'झुंड'चं दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगमी सिनेमांच्या शूटिंगमध्ये बीझी आहेत. यावर्षी त्यांचे एक-दोन नव्हे तर तब्बल 5 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष बिग बी गाजवणार हे निश्चत. अशातच त्यांच्या बहुचर्चित 'झुंड' या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे.

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा सिनेमा प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये काही मुलांचा घोळका हातात बॅट, चैन आणि हॉकी स्टीक इत्यादी घेऊन चालताना दिसत आहे. तर बॅकग्राउंड म्युझिकसोबत 'झुंड नाही सर टीम कहीए टीम' असा अमिताभ यांचा दमदार डायलॉग ऐकू येतो.

झुंड सिनेमाचं बहुतांश शूटिंग हे महाष्ट्रातील नागपूर शहरात झालं आहे. साधेपणा हे नागराज मंजुळेंच्या सिनेमांंचं वैशिष्ट्य त्यांनी या सिनेमातही जपलं आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सेटवरील काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात अमिताभ बच्चन अत्यंत साध्या वेशात दिसले होते. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय कमाल करतो याची सर्वांना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2020 12:12 PM IST

ताज्या बातम्या