आलिया भटच्या आईचं वादग्रस्त विधान, अफजल गुरुला म्हटलं ‘बळीचा बकरा’

आलिया भटच्या आईचं वादग्रस्त विधान, अफजल गुरुला म्हटलं ‘बळीचा बकरा’

अफजल गुरुनं त्याच्या पत्रात डीएसपी देवेंद्र सिंह यांनी त्याला टॉर्चर केल्याचं म्हटलं होतं यावरच सोनी राजदान यांनी वादग्रस्त ट्वीट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : महेश भट यांची पत्नी आणि सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भटची आई सोनी राजदान यांनी डीएसपी देवेंद्र सिंह आणि अफजल गुरु यांच्याशी संबंधित एक बातमी शेअर करत ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर स्वतःचं मत माडलं. ज्यात त्यांनी अफजल गुरुला बळीचा बकरा म्हटलं आहे. मात्र त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावरुन सोनी राजदान यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

सोनी राजदान यांनी अफजल गुरूच्या पत्राचा एक भाग त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यात त्यानं लिहिलं आहे की, डीएसपी देवेंद्र सिंह यांनी मला टॉर्चर केलं होतं आणि मला सांगितलं होतं की मला त्यांच्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे. सोनी राजदान यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘अशाप्रकारे न्यायाची खिल्ली उडवली जात आहे. त्या मेलेल्या व्यक्तीला कोण परत आणू शकणार आहे का जर शेवटी सिद्ध झालं की तो निर्दोष होता. त्यामुळे मृत्यूची शिक्षा देताना त्याची पूर्ण चौकशी केली जायला हवी. या प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हायला हवी की अफजल गुरुला बळीचा बकरा का केलं गेलं.’

VIDEO : साराच्या ‘आदाब’ला सलमान खाननं दिलेली प्रतिक्रिया पाहून व्हाल हैराण!

सोनी राजदान यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. तसेच अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिरक्रिया देत सोनी राजदान यांच्यावर टीका केली आहे. सोनी राजदान यांनी अफजल गुरुला बळीचा बकरा म्हटल्यानं सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. काहींनी याबाबत सोनी राजदान यांना समर्थन दिलं आहे. मात्र काही युजर्सनी यावरुन सोनी राजदान यांनी ट्रोल केलं आहे. एका युजरनं लिहिलं, आम्ही गद्दार आणि आतंकवाद्यांच्या मृत्यूवर अश्रू ढाळत नाही. हे जग त्यांच्याशिवायच चांगलं आहे.

TikTok चॅलेंज दिल्यानं दीपिका पुन्हा वादात, VIRAL VIDEO वरुन जोरदार टीका

दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘माझ्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेत लक्ष घेण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही तुमच्या देशाच्या सुरक्षेवर लक्ष द्या.’ तर आणखी एकानं लिहिलं. तुमच्या पतीचा किंवा मुलीचा नवा सिनेमा रिलीज होणार आहे का? तर तुझ्यासारखा माणसांची लाज वाटते. त्या लोकांचं काय ज्यांनी आमदार-खासदार यांना वाचवताना आपले प्राण गमावले.

 

View this post on Instagram

 

a whole lotta love 😘❤️

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

सोनी राजदान हिंदी सिनेमांव्यतिरिक्त देशातील राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसतात. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. सोनी राजदान यांची मुलगी आलिया भट लवकरच 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात ती रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

शाहरुखची लेक सुहानाच्या HOT सेल्फीनं धुमाकूळ, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

First published: January 21, 2020, 2:31 PM IST

ताज्या बातम्या