दारूच्या सवयीमुळे करिअरमधून घ्यावा लागला ब्रेक, बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

दारूच्या सवयीमुळे करिअरमधून घ्यावा लागला ब्रेक, बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

अति दारु पिण्याच्या सवयीमुळे बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करिअरमधून मोठा ब्रेक घ्यावा लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर: दारू किंवा बिअर घेणं हे काही जण जरी प्रतिष्ठेचं मानत असले तरी त्यामुळे कित्येकांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे किस्से आपण ऐकले आहेत. मात्र असाच एक अनुभव अभिनेत्रीनं सांगितला आहे. दारू पिण्याची सवय या अभिनेत्रीला महागात पडली आणि होत्याचं नव्हतं होण्याचं वेळ अक्षरश: तिच्यावर ओढवली. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या श्रुति कमल हसनचं आयुष्य उध्वस्त होता होता राहिलं.  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतिनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. त्यामध्ये तिनं तिच्या दारुच्या पिण्याच्या सवयीचाही उल्लेख केला आहे.

श्रुति कमल हसन हे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं होतं. मात्र मागच्या काही दिवसांपासून श्रुति मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं त्यामागचं कारण स्पष्ट केलं. मागच्या काही दिवसांपासून श्रुति तिच्या खासगी जीवनामुळे चर्चेत आहे. टीव्ही शो 'फीट अप विद द स्टार्स'मध्ये श्रुतिनं सांगितलं, 'मला दारु पिण्याची सवय लागली होती आणि ही सवय पुढे इतकी वाढली की मला माझ्या करिअरमधून ब्रेक घ्यावा लागला.'

...अन् अचानक ललित प्रभाकरने सर्वांसमोर पर्ण पेठेला उचलून मेकअप रूममध्ये नेलं!

 

View this post on Instagram

 

🖤

A post shared by @ shrutzhaasan on

श्रुति पुढे म्हणली, 'मागच्या वर्षी मी दारु पिणं सोडून दिलं त्यानंतर मी पुन्हा कधीच दारुला हात लावलेला नाही. काही काळापूर्वीच मी खूप आजारी पडले होते. यावर उपचार झाल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित मी अति दारु पिण्याच्या सवयीमुळे आजारी पडले. त्यामुळे मी दारु पिण्याचं सोडून दिलं.'

अभिनेत्री अमिषा पटेलला कधीही होऊ शकते अटक, वाचा काय आहे कारण

काही दिवसांपूर्वी श्रुतिचं तिचा बॉयफ्रेंड मायकल कॉरसेलशी ब्रेकअप झालं. एका मुलाखतीमध्ये श्रुति म्हणाली, मला त्याच्याबाबत कोणतीही तक्रार नाही. माझ्यासाठी हे नातं खूप चांगला अनुभव होता. मी या नात्यात बऱ्याचं गोष्टी नव्यानं शिकले. पण मी आता खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, ही एक गोष्ट आहे ज्याची मी नेहमीच वाट पाहत राहीन.

 

View this post on Instagram

 

One day in la 🖤shot by @engelauren for @cheadsmagazine

A post shared by @ shrutzhaasan on

मायकलनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर श्रुतिसोबत ब्रेकअप केल्याची घोषणा केली होती. मायकलनं त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं, 'देवाला कदाचित आमचं नातं मान्य नाही त्यामुळे आम्हाला वेगळं व्हावं लागत आहे. मात्र ही मुलगी नेहमीच माझ्यासाठी बेस्ट मेट असेल.'

सासरी घडलं तरी काय? ज्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्रा VIRAL VIDEO

==============================================================

पवारांचा हाच तो VIDEO; ज्यावर PM मोदींनी केली खुमासदार टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Oct 13, 2019 02:09 PM IST

ताज्या बातम्या