अभिनेत्री अमिषा पटेलला कधीही होऊ शकते अटक, वाचा काय आहे कारण

अभिनेत्री अमिषा पटेलला कधीही होऊ शकते अटक, वाचा काय आहे कारण

रांची कोर्टानं अमिषा पटेलच्या विरोधात अटक वॉरंट काढलं आहे. ज्यामुळे तिच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींंमध्ये गणली जाणारी अभिनेत्री अमिषा पटेल मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र एका वेगळ्याच कारणामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. रांची कोर्टानं अमिषा पटेलच्या विरोधात अटक वॉरंट काढलं आहे. अमिषावर प्रोड्युसर अजय कुमारनं अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर आता अमिषा पटेलच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

प्रोड्युसर अजय कुमार यांनी 2018मध्ये अमिषाला 'देसी मॅजिक' हा सिनेमा तयार करण्यासाठी 3 कोटी रुपये उधार दिले होते. त्यानंतर जेव्हा त्यांनी अमिषाकडे पैसे मागितले. त्यावेळी ती टाळाटाळ करू लागली. नंतर हा सिनेमा सुद्धा बंद झाला. त्यामुळे अजय यांनी पुन्हा एकदा त्यांचे पैसे परत मागितले. त्यावर अमिषानं त्यांना अडीच कोटींचा चेक दिला मात्र तो बाउंस झाला.

Bigg Boss वर बंदीचा सरकार करतंय विचार; BFF फॉर्म्युला पडला भारी

या प्रकरणी प्रोड्युसर अजय कुमार यांनी अमिषाच्या विरोधात रांची कोर्टात फसवणूकीची केस दाखल केली. अजय यांनी सांगितलं, केस दाखल केल्यानंतरही त्यांनी अमिषाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमिषा त्यांचा फोनही उचलला नाही आणि त्यांना भेटली सुद्धा नाही.

यानंतर कोर्टानं अमिषाला समन्स पाठवले आणि या पैशांबाबतची कारवाई चालूच राहिली. अमिषावर असे आरोप आहेत की, जेव्हा अजय त्यांच्याकडे पैसे मागायला गेले त्यावेळी काही प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे फोटो दाखवून अमिषानं अजय यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचा आरोप असण्याची अमिषाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्यावर फसवणूकीचा आरोप झाला आहे.

Viral Photo: मिलिंद सोमणने केलं अण्डरवॉटर रनिंग, पाठीवर होतं 12 किलोचं वजन

11 लाख रुपये घेऊन अमिषाची इव्हेंटला गैरहजेरी

आमिषा पटेलवर या अगोदरही फसवणूकीचे आरोप लावण्यात आले आहेत. अमिषावर एका इव्हेंट ऑर्गनायजरकडून 11 लाख रुपयांच्या फसवणूकीचा आरोप आहे. एका वेडिंग इव्हेंटमध्ये डान्स करण्यासाठी 11 लाख रुपये घेऊन अमिषानं या इव्हेंटला हजेरी लावलीच नव्हती.

Vicky Welingkar Poster : काय या मुखवट्यामागे दडलेल्या चेहऱ्याचं रहस्य!

==============================================================

राज ठाकरेंनी अमितसोबत मारला मिसळीवर ताव, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading