जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...अन् अचानक ललित प्रभाकरने सर्वांसमोर पर्ण पेठेला उचलून मेकअप रूममध्ये नेलं!

...अन् अचानक ललित प्रभाकरने सर्वांसमोर पर्ण पेठेला उचलून मेकअप रूममध्ये नेलं!

...अन् अचानक ललित प्रभाकरने सर्वांसमोर पर्ण पेठेला उचलून मेकअप रूममध्ये नेलं!

अभिनेता ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे प्रमुख भूमिका असलेल्या ‘मीडियम स्पायसी’ सिनेमाच्या सेटवर हा किस्सा घडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 13 ऑक्टोबर : अभिनेत्री पर्ण पेठे ही सेटवरील प्रँक्स आणि खोडकर वृत्तीसाठी ओळखली जाते. पुण्यात, ‘मीडियम स्पाइसी’ या सिनेमाच्या शुटींग दरम्यान तिने आपल्या सह-कलाकरांना आणि टीमला चांगलेच भंडावून सोडले होते. बरेचदा तिच्या निशाण्यावर सिनेमाचे क्रु मेंबर्स असायचे. शिवाय अभिनेता ललित प्रभाकरला सुद्धा पर्णच्या या प्रँन्क्सची चव चाखायला मिळाल्याचे कळते.असाच एक गमतीदार किस्सा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडला. एका दृश्यात ललितने पर्णला उचलून घ्यायचे होते, त्याने तिला खाली ठेवत असताना तिचा पाय जोरात मुरगळला. तरी सुद्धा असह्य वेदना सहन करत तिने चित्रीकरण सुरूच ठेवले. या प्रकाराने ललितला वाईट वाटले, त्याने पर्णला कुठलीही मदत लागल्यास देऊ केली. या वेळी पर्णने सहजच आपली मेकअप रूम बरीच दूर असून तिथे आता कस जायचं? अशी शंका उपस्थित केली. म्हणून ललितने पर्णला तिच्या मेकअप रूमपर्यंत उचलून नेले. सासरी घडलं तरी काय? ज्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्रा VIRAL VIDEO

    जाहिरात

    ज्या क्षणाला ललित तिथे पोहोचला आणि त्याने पर्णला खाली ठेवले, तसा संपूर्ण सेटवर हास्यकल्लोळ झाला. कारण, पर्ण पेठे आणि सागर देशमुख यांनी रचलेला हा एक प्रँन्क होता असे समोर आले. सागरने पर्ण बरोबर पैज लावली होती, की ललित तिला उचलून मेकअप रूमपर्यंत घेऊन जाणार नाही.

    याविषयी बोलताना ललित म्हणाला, ‘होय, त्या दिवशी पर्ण ने मला तसे करायला भाग पाडले. आता हा पूर्ण किस्सा जेव्हा मला आठवतो तेव्हा मला हसू येतं. तुमच्या सेटवर आनंदी वातावरण असेल तर अनेक गोष्टी अगदी सहज होतात आणि ‘मीडियम स्पाइसी’ बद्दल बोलायचे झाल्यास, हे मित्राचं गेट टू गेदर म्हणता येईल.’ ललित पुढे म्हणाला, ‘या सिनेमाचीकथा नाती आणि त्यांच्यातील संबंधांविषयी भाष्य करते. आणि मला खात्री आहे की सेट बाहेरही आम्हा मित्रांमध्ये असलेल्या मैत्रीपूर्ण संबधांचा गोडवा पडद्यावरील नात्यांना अधिक जिवंत करेल.’ Bigg Boss वर बंदीचा सरकार करतंय विचार; BFF फॉर्म्युला पडला भारी

    जाहिरात

    मोहित टाकळकर दिग्दर्शित, लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल आहेत. अभिनेता ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे प्रमुख भूमिकेत असून सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शीता, जेष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची सहकलाकार म्हणून साथ लाभली आहे. Viral Photo: मिलिंद सोमणने केलं अण्डरवॉटर रनिंग, पाठीवर होतं 12 किलोचं वजन =============================================================== राज ठाकरेंनी अमितसोबत मारला मिसळीवर ताव, पाहा हा VIDEO

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात