मुंबई, 13 ऑक्टोबर : अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा ‘द स्काय इज पिंक’मुळे चर्चेत आहे. या सिनेमातून तीन वर्षांनंतर प्रियांकानं बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहेत. यासाठी प्रियांकानं प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमाचं प्रमोशन प्रियांकानं फक्त भारतातच नाही तर परदेशातही केलं. नुकतीच एका अमेरिकन टॉप शोमध्ये प्रियांका तिच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचली मात्र त्या ठिकाणी तिच्यासोबत असं काही झालं की, तिला शोमध्येच रडू कोसळलं. भारतात प्रमोशन झाल्यानंतर प्रियांका अमेरिकेच्या टॉप शोमध्ये ‘द स्काय इज पिंक’चं प्रमोशन केलं. दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियांका जिमी फेलनचा लोकप्रिय शो ‘द टुनाइट शो विद जिमी फेलन’मध्ये पोहोचली. या शोमध्ये तिनं मनमोकळेपणे खूप गप्पा मारल्या आपल्या सिनेमाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. पण त्यानंतर प्रियांकाची तब्बेत बिघडली. जिमीनं ‘ईटिंग स्पाइसी विंग्स विद शॉन एवन्स’चा होस्ट शॉन एवन्ससोबत या शोमधील एक सेगमेंट ठेवलं होतं. या दरम्यान प्रियांका ढसाढसा रडली.
Viral Photo: मिलिंद सोमणने केलं अण्डरवॉटर रनिंग, पाठीवर होतं 12 किलोचं वजन
या सेगमेंटमध्ये प्रियांका आणि जिमी यांना एक टास्क देण्यात आला होता. ज्यात प्रचंड तिखट चिकन विंग खाताना प्रियांका आणि जिमीला गप्पा मारायच्या होत्या. प्रियांकानं पहिला विंग तर आरामात संपवला. दुसरा तिला काहीसा तिखट लागला. पण तिसरा चिकन विंग खाताना मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. तरीही तिनं टास्क पूर्ण करण्यासाठी चौथा विंग हातात घेतला पण तो खाताना प्रियांका अक्षरशः रडू लागली आणि तिनं गप्पा मारणंच बंद केलं.
Vicky Welingkar Poster : काय या मुखवट्यामागे दडलेल्या चेहऱ्याचं रहस्य!
दरम्यान शॉन एवन्ससोबत गप्पा मारताना प्रियांकानं सांगितलं की, हा टास्क निक जोनासनही पूर्ण केला होता आणि त्यावेळी त्याला हे खूपच महागात पडलं होतं. या शोमध्ये फक्त प्रियांकाच नाही तर जिमी सुद्धा रडला. पण या दोघांनी कसंही करुन हा टास्क पूर्ण केला.प्रियांकाचा हा भयंकर पण मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांकाच्या सिनेमाबद्दल बोलायचं तर ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा सत्य कथेवर आधारित आहे. मोटीव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी आणि तिच्या आई-वडीलांच्या संघर्षाची ही कथा दिग्दर्शिका सोनाली बोस यांनी मोठ्या पडद्यावर मांडली आहे. आयशाला पल्मोनरी फाइब्रोसिस नावाचा आजार असतो. तिचा वयाच्या 18 व्या वर्षी मृत्यू झाला होता. भारतात हा सिनेमा रिलीज होण्याआधी टोरंटो फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये याचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता.
‘माझ्या लेकीला कोणाची नजर न लागो’ अमृता सिंहचे साराला काजळ लावतानाचे Photo Viral
============================================================= राज ठाकरेंनी अमितसोबत मारला मिसळीवर ताव, पाहा हा VIDEO