जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / काँग्रेस नेत्याला नकार देणारी मेहरीन पीरजादा आहे तरी कोण?

काँग्रेस नेत्याला नकार देणारी मेहरीन पीरजादा आहे तरी कोण?

काँग्रेस नेत्याला नकार देणारी मेहरीन पीरजादा आहे तरी कोण?

लग्नाला केवळ तीन महिने उरलेले असताना मेहरीन हिनं आपलं लग्न मोडलं आहे. परंतु रातोरात प्रकाशझोतात आलेली ही अभिनेत्री आहे तरी?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 4 जुलै**:** मेहरीन पीरजादा (Mehreen Pirzada) ही अभिनेत्री सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिनं काँग्रेस नेता भव्य बिश्नोईससोबत (Bhavya Bishnoi) साखरपुडा केला होता. तीन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटत मेहरीन आणि भव्य यांनी साखरपुडा केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यांना इतका मोठा कार्यक्रम करण्याची संमती मिळाली कशी? असा प्रश्न देखील हा भव्य सोहळा पाहून अनेकांनी केला होता. परंतु आता मात्र लग्नाला केवळ तीन महिने उरलेले असताना मेहरीन हिनं आपलं लग्न मोडलं आहे. परंतु रातोरात प्रकाशझोतात आलेली ही अभिनेत्री आहे तरी? 26 वर्षीय मेहरीनचा जन्म पंजाबमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला होता. मॉडलिंगद्वारे तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मॉडलिंग करत असतानाच तिला ‘कृष्णा गाड़ी वीरा प्रेमा गाढा’ या तेलुगू चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. अन् या चित्रपटाद्वारे 2016 साली तिचं फिल्मी दुनियेत पदार्पण झालं. मेहरीनचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला मात्र तिनं आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. ‘तुझे चित्रपट कोणी पाहणार नाही’; नव्या Videoमुळे रिया चक्रवर्ती ट्रोल पुढे तिला फिल्लारी, नोटा, सुर्या, राजा द ग्रेट, कावाचम यांसारख्या अनेक तेलुगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पोट्टास या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिनं साऊथस्टार धनुशच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. सध्या ती भव्य बिश्नोईससोबत लग्न मोडल्यामुळे चर्चेत आहे. ‘मला फरक पडत नाही, कारण..’; आमिरसोबतच्या लिंकअपवर फातिमानं दिलं असं प्रत्युत्तर कोण आहे भव्य बिश्नोई**?** भव्य बिश्नोई (Bhavya Bishnoi) काँग्रेस नेता आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री (Ex Haryana CM) भजनलाल (Bhajan Lal) यांचा नातू आहे. भव्यचे वडील कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) हरियाणातील अदमपुर (Adampur) येथील आमदार आहेत. साखरपुड्यापूर्वी दोघांनी एक फोटोशूटही केला होता. जो मेहरीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) शेयर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात