जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग बींच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम; पडणार BMC चा हातोडा

बिग बींच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम; पडणार BMC चा हातोडा

बिग बींच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम; पडणार BMC चा हातोडा

मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) अमिताभ यांना 2017 मध्येच नोटीस बजावली होती. पण बिग बींकडून BMC ला कोणतही उत्तर देण्यात आलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 4 जुलै: बॉलिवूड चे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या घरावर मुंबई महानगर पालिका लवकरच कारवाई करू शकते. अमिताभ यांच्या मुंबईतील जुहू (Juhu) या ठिकाणी असलेल्या प्रतीक्षा बंगल्याची (Pratiksha Bunglow) एक भिंत महानगर पालिकेच्या जागेत येत आहे. त्यामुळे BMC यावर लवकरच हातोडा चालवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) अमिताभ यांना 2017 मध्येच नोटीस बजावली होती. पण बिग बींकडून BMC ला कोणतही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे आता BMC ने त्यांच्या कलेक्ट्रेट अधिकाऱ्यांना बिग बिंच्या बंगल्यावर अधिकृत कारवाई साठी जाण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात

दरम्यान BMC ने 2017 साली रोडची रुंदी वाढवण्यासाठी हे आदेश बच्चन कुटुंबाला दिले होते. या नोटीस मध्ये म्हटलं होत की प्रतीक्षा बंगल्याचा एक भूखंड संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी BMC ने अधिगृहित केला आहे.

बापरे! अभिषेकने बायकोला घातलं होतं एवढं महाग मंगळसूत्र; ऐश्वर्याने काही दिवसातच बदललं

BMC ने या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे कारण हा रस्ता थेट लिंक रोड आणि इस्कॉन मंदिराला जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच ट्रॅफिक जाम असते. यामुळेच पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता BMC बंगल्याची ही भिंत तोडणार हे निश्चित झालं आहे. मागील वर्षीच या कामाला परवानगी देण्यात आली होती. मुंबईच्या जुहू परिसरात बच्चन कुटुंबाचा प्रतीक्षा बंगला आहे. याशिवाय त्यांचे ‘झनक’ (Jhanak Bunglow) आणि ‘जलसा’ (Jalsa Bunglow) हे बंगले देखील काही अंतरावर स्थित आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात