मुंबई, 22 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं आतापर्यंत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती वरुण धवनसोबत ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात पुन्हा एकदा श्रद्धाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळणार आहे. प्रत्येक अभिनेत्रीच्या यशस्वी करिअरच्या मागे तिचा सुपरहिट सिनेमा असतो. पण श्रद्धाच्या बाबतीत असं काहीही घडलेलं नाही त्यामुळे या क्षेत्रात 10 वर्ष काम करुनही ती आता रस्त्यावर आली आहे.
श्रद्धा कपूरनं ‘तीन पत्ती’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलग 10 वर्ष तिनं बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात काम केलं पण आता ती रस्त्यावर आली आहे. म्हणजे श्रद्धा खरीखुरी रस्त्यावर आलेली नाही. तर तिचा आगामी सिनेमा ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा स्ट्रीट डान्सर म्हणजे रस्त्यावर डान्स करणाऱ्या मुलीच्या जीवनावर आधारित आहे. 2010 मध्ये आलेल्या ‘तीन पत्ती’ सिनेमानं श्रद्धा फारशी ओळख मिळवून दिली नव्हती. पण त्यानंतर 2013 मध्ये आलेला ‘आशिकी 2’ सुपरहिट ठरला आणि श्रद्धा रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.
पतीसोबत रोमान्स करताना भारती सिंहने बनवला tik tok व्हिडिओ, पण तितक्या...
लवकरच श्रद्धा आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका असलेला स्ट्रीट डान्सर येत्या 26 जानेवारीला रिलीज होत आहे. यात भारत-पाकिस्तान डान्स वॉर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा दमदार ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. त्याशिवाय सध्या या सिनेमातील गर्मी साँग इंटरनेटवर ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत.
आधी ‘तान्हाजी’ सिनेमाला म्हटलं ‘वाहियात’, आता अभिनेत्याचा ट्विटरवरुन माफीनामा
वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा सिनेमा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. टी सीरिजची निर्मिती असलेला हा सिनेमा रेमो डिसूझानं दिग्दर्शित केला आहे. याआधीही त्यानं अशाप्रकाचे सिनेमे तयार केले आहेत ज्यात ABCD आणि ABCD-2 या सिनेमांचा समावेश आहे.
कंगना रणौतचा मोठा खुलासा, आता मिशन 'राममंदिर'
Published by:Megha Jethe
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.