मुंबई, 22 जानेवारी : कॉमेडियन भारती सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी सर्वांना हसवणारी भारती सिंहनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. भारती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फनी व्हिडीओ शेअर करत असते. पण तिचा पती हर्ष लिंबाचिया सोबत रोमान्स करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भारती सिंह बेडरुममध्ये झोपलेल्या हर्षसोबत रोमान्स करताना दिसत आहे. पण अचानक हर्ष जागा होतो आणि दोघं एकत्र डान्स करु लागतात. भारती आणि हर्षच्या या फनी व्हिडीओवर चाहत्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच कमेंट करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओवर खूप लाइक्स आणि कमेंट आल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना भारतीनं लिहिलं, ‘प्यार करते-करते देखो क्या हो गया’
कंगना रणौतचा मोठा खुलासा, आता मिशन 'राममंदिर'
भारती सिंहच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या ती कपिल शर्मा शोमध्ये ‘बुवा जी’ची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती सुद्धा मिळत आहे. याशिवाय ती कलर्स टीव्हीवरील खतरा-खतरा शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया सुद्धा होता. हे दोघं मिळून सेलिब्रेटींकडून धम्माल टास्क करुन घेत असत. याशिवाय भारती टिकटॉकवरही खूप सक्रिय आहे.
टायगरच्या अगोदर 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती दिशा पाटनी, पण...
सचिन तेंडुलकरच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर! मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.