Home /News /entertainment /

आधी ‘तान्हाजी’ सिनेमाला म्हटलं ‘वाहियात’, आता अभिनेत्याचा ट्विटरवरुन माफीनामा

आधी ‘तान्हाजी’ सिनेमाला म्हटलं ‘वाहियात’, आता अभिनेत्याचा ट्विटरवरुन माफीनामा

या अभिनेत्यानं 'पानीपत' आणि 'तान्हाजी' सिनेमाची तुलना करत हा सिनेमा खूप वाईट असा रिव्ह्यू दिला होता.

    मुंबई, 22 जानेवारी : अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या तान्हाजी सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अवघ्या 2 आठवड्यातच या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर आता हा सिनेमा लवकरचं 200 कोटींची कमाई करेल. या सिनेमाचं प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही खूप कौतुक केलं. पण सिनेमा रिलीज झाल्यावर वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जाणारा अभिनेता केआरकेनं हा सिनेमा वाईट असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यानं त्याचं हे विधान मागे घेत ट्विटरवरुन माफी मागितली आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट लिहित या सिनेमाच्या वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली. त्यानं लिहिलं, तान्हाजी सिनेमाचं दुसऱ्या आठवड्यातील प्रदर्शनही दमदार राहिलं. त्यामुळे हा सिनेमा 250 कोटींचा आकडा नक्कीच पार करेल. हा एक हिट सिनेमा आहे. जर प्रेक्षकांना हा सिनेमा आवडत असेल तर मी माझ्या रिव्ह्यूबद्दल माफी मागतो. कारण ‘जनता की आवाज नकारे खुदा’ टायगरच्या अगोदर 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती दिशा पाटनी, पण... केआरकेनं हा सिनेमाला अत्यंत ‘वाहियात’ सिनेमा असल्याचं म्हटलं होतं. तर ‘पानीपत’ सिनेमा ‘तान्हाजी’ पेक्षा 10 पटींनी चांगला असल्याचंही त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. त्यानं तान्हाजी सिनेमाला अवघा एक स्टार दिला होता. ‘तान्हाजी’ सिनेमाबद्दल बोलायचं तर या सिनेमानं आतापर्यंत 175 कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाचं कलेक्शन 16 कोटींचं होतं. त्यामुळे या सिनेमासोबत शर्यतीत असलेला दीपिका पदुकोणचा छपाक सिनेमा केव्हाचं मागे पडला. आता तिसऱ्या आठवड्यात हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकरच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर! OMG! लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Ajay devgan, Bollywood

    पुढील बातम्या