Home /News /entertainment /

कंगना रणौतचा मोठा खुलासा, आता मिशन 'राममंदिर'

कंगना रणौतचा मोठा खुलासा, आता मिशन 'राममंदिर'

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं याचा खुलासा केला.

  मुंबई, 22 जानेवारी : अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिचा आगामी सिनेमा ‘पंगा’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण या सिनेमानंतर कंगनाकडे खूप मोठा प्रोजेक्ट आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं याचा खुलासा केला. कंगना या मुलाखतीत जयललिता बायोपिक नंतर तिच्या पुढच्या मिशन बद्दल सांगताना आपलं पुढचं मिशन राममंदिर असल्याचा मोठा खुलासा केला. कंगना ‘पंगा’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिहारला पोहोचली होती. यावेळी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगानाला तिच्या नव्या प्रॉडक्शन हाउसचं नाव आणि तिच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या सिनेमाचं नाव विचारण्यात आलं होतं. याचं उत्तर देताना कंगना म्हणाली. माझ्या प्रॉडक्शन हाउसचं नाव मी माझा सिनेमा मणिकर्णिकाच्या नावावरुन मणिकर्णिका असं ठेवलं आहे आणि आम्ही राम मंदिरावर आधारित अयोध्या नावाच्या सिनेमाची निर्मिती करत आहोत. सचिन तेंडुलकरच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर!
  या मुलाखतीवेळी कंगनासोबत भोजपुरी अभिनेता आणि बीजेपी खासदार रवि किशन सुद्धा उपस्थित होते. यावेळी कंगनाला तिच्या लग्नाविषयी सुद्धा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली, तुम्ही या ठिकाणी माझ्या स्वयंवराचं आयोजन करु शकता. आपल्या इतिहासात स्वयंवराची खूप उदाहरणं आहेत. ज्यात मुलीला तिचा वर स्वतः निवडण्याची मुभा होती. OMG! लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट कंगनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिची मुख्य भूमिका असलेला पंगा हा सिनेमा येत्या 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात कंगना कबड्डीपटूच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केलं असून या सिनेमात रिचा चढ्ढा, नीना गुप्ता आणि जस्सी गिल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बॉयफ्रेंड पैसे तर मागायचा, पण माझ्या कामाची त्याला लाज वाटायची
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Kangana ranaut

  पुढील बातम्या