मुंबई, 21 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Bollywood Actress and Shiv Sena leader Urmila Matondkar) यांचं इंस्टाग्राम अकाउंट (Instagram account) हॅक करण्यात आलं आहे. या प्रकरणी उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध FIR दाखल केली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यानंतर त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. उर्मिला यांनी ट्वीट करत त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट अज्ञात व्यक्तीनं हॅक केल्याची माहिती दिली होती.
हेही वाचा...भाजप खासदाराच्या पत्नीचा TMC मध्ये प्रवेश, काही तासांत पतीची घटस्फोटाची नोटिस
उर्मिला यांनी तातडीनं या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर उर्मिला यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. त्यांना सगळ्या प्रकाराची माहिती दिली आहे. उर्मिला यांच्या तक्रारीची सायबर सेलनं गंभीर दखल घेतली असून FIR दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
“Cyber crimes” is not something that women should take lightly..as I went to file FIR on my @instagram ac hacking met this dynamic DCP #cybercrime @MumbaiPolice Smt. Rashmi Karandikar who enlightened me lot more on the issue. Will surely be working on it in future. @MahaCyber1 pic.twitter.com/0cSKaoeONX
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 16, 2020
दरम्यान, पतीला पाकिस्तानी, दहशतवादी म्हटलं गेल्यानं उर्मिला मातोंडकर गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सवर चांगल्याच भडकल्या यावरून त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहे.
उर्मिला यांनी शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. अलिकडेच उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या पतीच्या धर्मावरुन ट्रोलर्सनं त्यांना लक्ष्य केलं होतं. त्यावर उर्मिला मातोंडकर यांनीही ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या विकिपीडिया पेजवरही काही नमुन्यांनी आक्षेपार्ह बदल केले होते, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा...पुण्यात जन्मदात्यानेच आपल्या 9 वर्षींच्या मुलीला बनवली वासनेची शिकार!
उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘माझे पती मोहसीन अख्तर मीर यांच्याबद्दल सोशल मीडियावर उलट सुलट अफवा पसरवली जात आहेत. मोहसिन यांना दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हटलं गेलं. काही लोकांनी माझ्या विकिपिडीया पेजवर बदल केले होते. त्यात माझ्या आई-वडिलांचं नाव बदलण्यात आलं. आईचं नाव रुखसाना अहमद आणि वडिलांचं नाव शिविंदर सिंह असं करण्यात आलं होतं.’ त्यांच्या वडिलांचं खरं नाव श्रीकांत मातोंडकर आणि आईचं नाव सुनीता मातोंडकर आहे, असा खुलासा देखील उर्मिला यांनी केला आहे.