भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश, काही तासांत पतीची घटस्फोटाची नोटिस

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश, काही तासांत पतीची घटस्फोटाची नोटिस

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या (West Bengal Election) एक वर्ष आधीपासूनच रंजक घडामोडी घडत आहेत. एका खासदार पतीनं राजकीय कारणांमुळं पत्नीला थेट घटस्फोटाची नोटिस पाठवली आहे.

  • Share this:

कोलकाता, 21 डिसेंबर : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) पुढच्या वर्षी होणार असल्या तरी आतापासूनच अनेक खळबळजनक घटना समोर येत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah in Begal) बंगालच्या दौऱ्यावर होते. त्यांचा दौरा संपता संपताच एका खासदार पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं जाहीर केलं. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्या भाजप खासदाराने थेट पत्नीला घटस्फोटाची नोटीचस पाठवली आहे. भाजपचे खासदार सौमित्र खान (Saumitra Khan) यांनी पत्नी सुजाता मोंडल (Sujata mondal) यांना पक्षबदल प्रकरणात थेट घटस्फोटाची नोटिस पाठवली आहे.

सौमित्र खान यांची पत्नी सुजाता मोंडल यांनी नुकताच TMC मध्ये प्रवेश केला आहे. पत्नीने भाजप सोडून टीएमसी अर्थात तृणमूल कॉन्ग्रेसमध्ये प्रवेश केल्याची बाब खासदार पतीच्या पचनी पडली नसल्याचे चित्र आहे.

पश्चिम बंगाल मध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी वातावरण चांगलच तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. तृणमूलला गळती लागलेली असतानाच आता भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल (Sujata Mandal) तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजप तृणमूलचे नेते आपल्या गळाला लावत असल्याने तृणमूलनेही आपण भाजपला धक्का देऊ शकतो याचे संकेत यातून दिले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात माजी मंत्री आणि ममतांचे विश्वासू सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सौमित्र खान हे भाजपच्या युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्या म्हणाल्या, की मी एका दलित जातीतून येणारी महिला आहे. भाजप हा आता फक्त संधीसाधूंचा पक्ष बनला असून निष्ठवान नेत्यांचा काहीही सन्मान राहिलेला नाही. एक महिला असल्याने भाजपमध्ये काम करणे यापुढे शक्य नसल्याचंही सुजाता मंडल यांनी म्हटलं आहे.

अमित शहा (Amit shah) यांनी दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यात (West bengal) म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. भाजप (BJP) याठिकाणी बहुमतानं निवडून येईल आणि ममता बॅनर्जीला ऐतिहासिक पराभवाला सामोरं जावं लागेल.

Published by: News18 Desk
First published: December 21, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading