मराठी बातम्या /बातम्या /देश /

जन्मत:च मुलीला झाला कोरोनाचा संसर्ग; जन्मदात्यांनी बाळाला रुग्णालयातच सोडून काढला पळ

जन्मत:च मुलीला झाला कोरोनाचा संसर्ग; जन्मदात्यांनी बाळाला रुग्णालयातच सोडून काढला पळ

जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

रुग्णालयाने अनेकदा विनंती करुन देखील ते आई-वडिल मुलीसाठी पुढे आले नाहीत

  • Published by:  Meenal Gangurde

रांची, 8 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 80000 टप्पा गाठत आहे. ही आकडेवारी भीती वाढवणारी आहे. दुसरीकडे अनेक जन्मजात बाळांमध्येही कोरोनाची लागण होत असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. मात्र झारखंडमध्ये घडलेली ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे.  झारखंडची राजधानी रांची स्थित रिम्स (RIMS) सुपर स्पेशालिटी विंगमध्ये दाखल केलेल्या एका 18 दिवसांच्या नवजात बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याने त्याचे कुटुंबीय त्याला रुग्णालयातच सोडून गेले. चार दिवसांपूर्वी बाळाच्या आई-वडिलांना अनेकदा सांगूनही ते तिला घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात आले नाहीत. अशावेळी रिम्सच्या डॉक्टरांनी स्वत:च्या जबाबदारीवर बाळाचा जीव वाचविण्याचे ठरवलं.

यामध्ये डॉक्टरांना काही स्वयंसेवी संघटनांनीही मदत केली. सोमवारी नवजातवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून (Operation) ही यशस्वी झाली आहे. सध्या बाळाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पेडिअॅट्रिक सर्जन डॉ. अभिषेक रंजन यांनी न्यूज-18 ला सांगितले की मुलीच्या शरीरातील आतड्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र अद्यापही मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिला 48 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आहे, मुलीकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर तिची प्रकृती सुधारेल.

हे ही वाचा-भाजप सरकारचा मोठा निर्णय; या राज्यात आता मोफत होणार कोरोनाची टेस्ट

नवजातला रिम्समध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा शस्त्रक्रियेपूर्वी कोरोना चाचणी केली तर मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर विश्रामपुरमध्ये राहणारे आई-वडिल नवजातला रुग्णालयात सोडून आले. रिम्सने याची सूचना रांची जिल्हा प्रशासनाला दिली. रांची प्रशासनाने याबाबत नवजातच्या आई-वडिलांना सांगितले, मात्र ते आले नाही, तर मुलीचे आजी-आजोबा रुग्णालयात पोहोचले. आता मुलीचे आजी-आजोबा तिचा सांभाळ करीत आहेत.

First published: