नवी दिल्ली 09 सप्टेंबर: भारत आणि चीनदरम्यानचा सीमा विवाद शांत होण्याची शक्यता दिसत नाही. सीमेवर तणाव असतांनाच लडाख (Ladakh) मध्ये एका घटनेने भारतीय लष्कराचं(Indian Army) लक्ष वेधून घेतलं. तणाव असतांनाही वाद चिघळणार नाही याची काळजी भारत घेत आहे. चिनी भागातून अरूणाचल सीमा पार करून चीनचे 13 याक आणि 4 पिल्लं भारतीय हद्दीत आले होते. भारतीय लष्कराने त्या सगळ्यांना चिनी लष्कराकडे सुपूर्द केलं. त्यामुळे चिनी लष्कराने भारताचे आभारही मानले आहेत. मात्र हे करण्याआधी भारतीय लष्कराने मोठा निर्णय घेत हेरगिरीचा संशय आल्याने सखोल तपासणी केली होती. दोन दिवसांपूर्वी हे याक भारतीय हद्दीत आल्यानंतर लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं होतं. हे प्राणी चीनमधून आलेत हे स्पष्ट झाल्यानंतर हा हेरगिरीचा डाव तर नसेल ना याचा संशय भारतीय लष्कराला आला. सीमेवर शेजारच्या देशांकडून असे प्रकार केला जात असतात. त्यामुळे लष्कराच्या तज्ज्ञांनी खास ऑपरेशन राबवलं आणि हे याक हेरगिरीसाठी आले होता काय? याची शहानिशा केली. त्यासाठी या सगळ्या प्राण्यांच्या अनेक टेस्ट केल्या. एक्स रे काढले. सर्व अहलवाल मिळाल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. त्यानंतरही काही दिवस वाट पाहून हे याक परत करण्याचा निर्णय झाला. Exclusive : चीनचं पितळ उघडं पडलं; भारतीय सीमेत शस्त्रासह घुसखोरी केल्याचे PHOTOS त्यामुळे या सर्व प्राण्यांना चीनच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला. भारतीय अधिकाऱ्यांनी हे य सर्व याक चिनी अधिकाऱ्यांकडे सोपवले आणि मित्रत्वाचा संदेशही दिला. चिनी अधिकाऱ्यांनी भारताचे आभारही मानले अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची भेट होण्याची शक्यता आहे. गुरुवारी दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात आले. दोन्ही देशांमधील ही बैठक शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) येथे होऊ शकते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील SCOच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाला पोहोचले आहे. पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची भेट होईल की नाही हे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. ड्रॅगनच्या कुरघोडीवर संरक्षण मंत्रालयाचा खुलासा,तर जम्मूत उतरले फायटर हेलिकॉप्टर अलीकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियामधील SCO दरम्यान मॉस्को येथे चिनी समकक्ष जनरल वेई फेन्गी यांची भेट घेतली. संरक्षणमंत्री सिंग यांना भेटण्याची विनंती चीनने केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.