मुंबई, 16 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अनेक स्टायलिश फोटोशूट ती शेअर करत असते. शिल्पा बाहेर पडली की पापाराझींचा घेरा तिच्या भोवती असतोच. पापाराझींची शिल्पा ही फेव्हरेट अभिनेत्री आहे असं म्हणायला हवं. पापाराझींना फोटोसाठी पोझेस द्यायला शिल्पा कधीच नाही म्हणत नाही. फोटोसाठी पापाराझींना कधीच शिल्पाला रिक्वेस्ट करावी लागत नाही. शिल्पा नेहमीच फोटोग्राफर्सशी गप्पा मारताना दिसली आहे. ती नेहमीच त्यांच्याशी नीट वागते. पण शिल्पाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती चक्क पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे. फोटोग्राफर्सना चांगलेच खडे बोल सुनावताना शिल्पा दिसत आहे. शिल्पा शेट्टी बॉलिवूडची सर्वात फॅशनेबल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिल्पाची स्टाइल सर्वांना आवडते. तिचे चाहते तिला पाहण्यासाठी घरासमोर तासंतास उभे असतात. फोटोग्राफर्स तर शिल्पाला पाहण्यासाठी कायम तिच्या मागे असतात. पण यावेळी शिल्पाचे फोटो काढताना फोटोग्राफर्सनी चूक केली आणि शिल्पा त्यांच्यावर चांगलीच भडकल्याचं दिसली. या गोंधळात तिच्या डोक्याला देखील लागल्याचं दिसत आहे. हेही वाचा - Alia Ranbir Daughter : आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या बाळाचं नाव फायनल! ऋषी कपूरशी आहे खास कनेक्शन शिल्पा शेट्टी तिच्या अपार्टमेंटच्या बाहेर येत असताना फोटोग्राफर्सनी तिला स्पॉट केलं. शिल्पा नेहमी प्रमाणे बाहेर आली. सगळेच तिच्या कॅन्डिड फोटोंसाठी गडबड करत होते. शिल्पा थांबली आणि तिनं धावण्याच्या काही पोझेस दिल्या. त्यानंतर ती कारच्या दिशेनं निघाली. पण फोटोग्राफर्सचं मन काही भरलं नाही. ते शिल्पाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. काही तर तिच्या अगदी जवळ येऊ लागले.
या सगळ्या प्रकारावर शिल्पा चांगलीच भडकली. ‘अब मुंह में घुस कर फोटो लोगे क्या?’, असं म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिल्पा रागात कारमध्ये बसायला गेली. घाईगडबडीत कारमध्ये बसताना तिचं डोकं आपटलं. पण शिल्पा मात्र शांतपणे कारमध्ये बसली तिनं कोणताही आरडा ओरडा केला नाही. शिल्पा फार दिलदार माणूस आहे असं म्हणतात. कारमध्ये बसताना तिनं हसून सगळ्या फोटोग्राफर्सना बाय बाय केलं.
मध्यंतरी शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाली होती. रोहित शेट्टीबरोबर आगामी सिनेमाच्या शुटींगवेळी शिल्पाच्या पायाला दुखापत झाली. रोहित शेट्टीचा अँक्शन सीन शिल्पाला चांगलाच महागात पडला. शिल्पाच्या पायाला फ्रॅक्चर करण्यात आलं होतं. संपूर्ण गणपती आणि दसऱ्याच्या महिन्यात शिल्पा पायाच्या दुखापतीमुळे घरी आराम करत होती. गणपतीतील शिल्पाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता शिल्पाचा पाय अगदी ठिक असून तिनं शुटींगला सुरूवात केली आहे.

)







