मुंबई, 6 सप्टेंबर: सलमान खान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’चा नवा सीझन घेऊन येत आहे. कोण कोण सामील होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या घरात सामील होणाऱ्या स्पर्धकांमध्ये काही नावे देखील चर्चेत आहेत. मात्र सर्वात जास्त चर्चा आहे, ती शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा लवकरच ‘बिग बॉस 16’मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षात पोर्नोग्राफी प्रकरणी त्याला अटक झाली होती. तेव्हापासून हे नाव सगळीकडेच परिचित झालं आहे. आता तो बिगबॉस मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. बिग बॉसच्या घरात नेहमीच वादग्रस्त लोकांना स्थान मिळाले आहे.त्या त्या वर्षातील चर्चेत राहिलेले चेहरे सहभागी होताना दिसतात. याच कारणामुळे यंदा राज कुंद्राचे नाव देखील चर्चेत आहे. गेल्या वर्षी राज कुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणात अडकला होता आणि ‘बिग बॉस’मध्ये फक्त अशा लोकांनाच अप्रोच केले जाते, जे एखाद्या वादात सापडले होते. त्यामुळेच ‘बिग बॉस 16’ साठी राज कुंद्राचे नाव चर्चेत आले आहे.
सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की, राज आणि शोच्या निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू असून तो ‘बिग बॉस 16’ मध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहे. देशाला सत्य सांगण्याची गरज आहे, असे त्याला वाटते. येथे इशारा राज यांच्यावरील आरोपांकडे आहे, ज्याबद्दल त्यांना त्यांची बाजू लोकांसमोर मांडायची आहे त्यासाठी बिग बॉस हे उत्तम व्यासपीठ आहे असे त्याला वाटते. हेही वाचा - Brahmastra : काय सांगता! ऑस्कर विजेत्या कंपनीने ब्रह्मास्त्रच्या VFXवर केलंय काम; हॉलिवूडशी केली जातेय गणना शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हि देखील बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. आता राज कुंद्रा खरंच या सहभागी होणार का त्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात अॅक्वा थीम असणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सलमान खानने ‘बिग बॉस 16’च्या पहिल्या प्रोमोचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता प्रोमोची उत्सुकता आहे. लवकरच ‘बिग बॉस 16’चा प्रोमो आऊट करण्यात येणार आहे. नवं पर्व प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करणार आहे.