जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Brahmastra : काय सांगता! ऑस्कर विजेत्या कंपनीने ब्रह्मास्त्रच्या VFXवर केलंय काम; हॉलिवूडशी केली जातेय गणना

Brahmastra : काय सांगता! ऑस्कर विजेत्या कंपनीने ब्रह्मास्त्रच्या VFXवर केलंय काम; हॉलिवूडशी केली जातेय गणना

Brahmastra

Brahmastra

बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ च्या तगड्या VFX मागचं रहस्य काय आहे बघा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर: बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यांच्यासोबतच चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय या कलाकारांचे पॉवर पॅक्ड भूमिका बघायला मिळणार आहेत. तसेच ब्रम्हास्त्र मध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हेही दिसणार आहेत अशा चर्चा होत्या.  ब्रम्हास्त्र चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाच्या VFX बद्दल प्रचंड चर्चा होतेय. कोणी म्हणतंय कि भारतामध्ये पहिल्यांदाच एवढे चांगले व्हीएफएक्स वापरण्यात आलेत तर कोणी म्हणतय कि हॉलिवूडच्या चित्रपटाची कॉपी केली आहे. पण आज ‘ब्रह्मास्त्र’ च्या व्हीएफएक्स मागची एक महत्वाची बाब जाणून घेणार आहोत. भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर आला, तेव्हा त्याचे व्हिज्युअल पाहून लोक आश्चर्यचकित झाले. एसएस राजामौली यांचे RRR आणि बाहुबली यांना टक्कर देणारे व्हीएफएक्स या चित्रपटात आहे. अलीकडेच ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनवेळी एसएस राजामौली या चित्रपटाच्या व्हीएफएक्सचे कौतुक करत होते. ब्रह्मास्त्र हा चित्रपट पूर्णपणे व्हीएफएक्सवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाचे व्हीएफएक्सतितकेच जबरदस्त असणे आवश्यक होते. हेही वाचा - Pooja Sawant : पूजाला मिळाला पुण्यातील प्रसिद्ध गणपतीच्या आरतीचा मान; पाहा व्हिडीओ व्हीएफएक्सचे काम दिग्दर्शकाची दृष्टी शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पडद्यावर आणणे आहे.  त्यामुळेच हे काम एका मोठ्या कंपनीला देण्यात आले होते. तब्बल  6 ऑस्कर जिंकणाऱ्या कंपनीने ‘ब्रह्मास्त्र’ च्या व्हीएफएक्सवर काम केले आहे. 2021 मध्ये आलेल्या ‘डून’ या हॉलिवूड चित्रपटाने 6 ऑस्कर जिंकले. यातून या चित्रपटाला ‘बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट’साठी ऑस्कर मिळाला. चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करणाऱ्या कंपनीचे नाव DNEG होते. या कंपनीने ‘ब्रह्मास्त्र’च्या VFX वर काम केले आहे.

जाहिरात

ज्या चित्रपटांसाठी DNEG ने व्हिज्युअल इफेक्टसाठी ऑस्कर जिंकले आहेत ते इंटरस्टेलर, टेनेट आणि इनसेप्शन हे  आहेत. अलीकडेच हैदराबादमध्ये ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान  डीएनईजीचे नमित मल्होत्रा ​​म्हणाले, ‘आम्हाला भारतीय चित्रपटाला वेगळ्या उंचीवर न्यायचे आहे. भारतीय चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ब्रह्मास्त्र हा त्याचा पुरावा आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बजेट सिनेमांविषयी  नकारात्मक वातावरण निर्माण झाले असले तरी ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर त्याचा परिणाम होणार नाही कारण या सिनेमाचे प्रदर्शनाआधीच मोठ्या प्रमाणात त्यामुळे झाले आहे. पण सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांचं नशीब पणाला लागलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉलिवूडच्या नावेला तारणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात