Home /News /entertainment /

Shibani Dandekar नं या नाजूक भागावर गोंदवला टॅटू, लिहिलं बॉयफ्रेंड Farhan Akhtar चं नाव

Shibani Dandekar नं या नाजूक भागावर गोंदवला टॅटू, लिहिलं बॉयफ्रेंड Farhan Akhtar चं नाव

शिबानी दांडेकर आज आपला 41 वा वाढदिवस (Shibani Dandekar Birthday) साजरा करीत आहे. यानिमित्त तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी दिल्ली 27 ऑगस्ट : प्रसिद्ध मॉडेल आणि अँकर शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 41 वर्षांची झाली आहे. आज आपला वाढदिवस (Birthday) साजरा करीत असणाऱ्या शिबानी दांडेकर हिने वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या मानेवर एक टॅटू काढलाय, जो चांगलाच चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) याच्यासोबत शिबानी दांडेकर रिलेशनशीपमध्ये (Relationship) आहे. हे दोघेही आपलं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. दोघेही सतत त्यांचे सुंदर फोटो शेअर करत राहतात. पण आता तर शिबानीनं आपल्या मानेवर फरहानचं नाव गोंदवून घेतलं आहे. अहो म्हणजे टॅटू काढला आहे. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार माहितीये का? वाचून व्हाल अवाक शिबानी दांडेकर आज आपला 41 वा वाढदिवस (Shibani Dandekar Birthday) साजरा करीत आहे. यानिमित्त तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिबानी दांडेकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने काढलेला नवीन टॅटू दिसत आहे. शिबानीनं हा टॅटू तिच्या गळ्यावर काढला असून त्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड असलेल्या फरहान अख्तरचे नाव ‘फरहान’ असे गोंदवून घेतले आहे. शिबानीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. फरहान अख्तरसोबत शिबानी दांडेकर गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. एवढेच नाही तर त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावरही पाहायला मिळतात. शिबानीनं बॉयफ्रेंड फरहान अख्तरच्या नावाचा टॅटू हा तिच्या गळ्यावर काढलाच आहे, शिवाय ती तिच्या हातावर टॅटू बनवताना दिसत आहे. फरहान अख्तरने 2000 मध्ये अधुना भबानी (Adhuna Bhabani) यांच्याशी लग्न केलं होते आणि 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुली आहेत. तिच्यावरून नजरही हटेना; चिमुकल्या फॅनचाच फॅन झाला कार्तिक आयर्न शिबानी दांडेकर प्रसिद्ध मॉडेल, गायिका आणि अँकर आहे. तिने आयपीएल स्पर्धाही होस्ट केली आहे. ती 'खतरों के खिलाडी' आणि 'झलक दिखला जा' या गेम शोंमध्येही दिसली होती. अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) तिची धाकटी बहीण आहे. फरहान अख्तर हा नुकताच 'तुफान' चित्रपटामध्ये दिसला होता. ज्यामध्ये त्याने बॉक्सरची भूमिका साकारली होती. तो लवकरच आलिया भट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत 'जी ले जरा' या त्याच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट तो दिग्दर्शित करतो आहे. दरम्यान, फरहानसोबत शिबानीच्या नात्याची सुरुवात एका टीव्ही शोदरम्यान झाली होती. दोघं आपल्या नात्याविषयी स्पष्ट भूमिका मांडतात, ते आपल्या सोशल मीडियावरुन फोटोही शेअर करत असतात.
First published:

Tags: Bollywood News, Farhan akhtar, Tattoo

पुढील बातम्या