कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती छोटीशी गोड मुलगी कार्तिकच्याच एका गाण्यावर धमाल डान्स करत आहे आणि कार्तिक बाजूला उभा राहून तिचा नाच कौतुकाने बघत असल्याचंही दिसतं. हे वाचा - Bikini वर पाहण्यासाठी आसुसला होता चाहता; सोनाक्षीने असं काही दाखवलं तो हडबडलाच या छोट्याशा चाहतीचं त्याला प्रचंड कौतुक वाटत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या हास्यातून दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने ‘असे छोटे छोटे क्षण कृतज्ञ करतात’ अशी भावना व्यक्त केली आहे. यापूर्वीही त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये कार्तिक एका मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. नंतर तो गुडघ्यावर बसतो आणि त्या मुलीच्या हाताचं चुंबन घेत तिला आलिंगन देताना दिसत आहे. हे वाचा - Bigg Boss Marathi तिसरं पर्व IPL च्याच मुहूर्तावर; होस्ट मांजरेकरांचा लुक पाहा हा देखणा अभिनेता सध्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून, लवकरच तो अनीस बज्मी (Anis Bajmi) यांच्या ‘भुलभुलैया 2’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. याशिवाय रोहित धवनचा चित्रपटही त्याने साइन केला असून, सध्या त्याचं प्री-प्रोडक्शन सुरू आहे. रॉनी स्क्रूवाला निर्मित ‘धमाका’ (Dhamaka) हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित होणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Bollywood, Bollywood actor, Entertainment, Kartik aryan