मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमिताभ बच्चन यांच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार माहितीये का? वाचून व्हाल अवाक

अमिताभ बच्चन यांच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार माहितीये का? वाचून व्हाल अवाक

अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल बॉडीगार्डमध्ये अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेल्या मराठमोळ्या जितेंद्र शिंदेचं नाव घेतलं जातं. बच्चन यांच्यासोबत अनेक ठिकाणी जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) जातो.

अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल बॉडीगार्डमध्ये अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेल्या मराठमोळ्या जितेंद्र शिंदेचं नाव घेतलं जातं. बच्चन यांच्यासोबत अनेक ठिकाणी जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) जातो.

अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल बॉडीगार्डमध्ये अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेल्या मराठमोळ्या जितेंद्र शिंदेचं नाव घेतलं जातं. बच्चन यांच्यासोबत अनेक ठिकाणी जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) जातो.

मुंबई 27 ऑगस्ट : बॉलिवूडचे महानायक आणि चित्रपटरसिकांचे लाडके बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रसिद्धी सर्वांनाच माहिती आहे. गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे अमिताभ बच्चन यांचं नाव आजही आबालवृद्ध जाणतात. बच्चन यांचे चाहते प्रत्येक पिढीत आहेत. अगदी मिलेनियल्समध्येही ते आहेतच. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्याभोवती बॉडीगार्ड्सचं (Personal Body Guard) सुरक्षा कडं असतं. हे बॉडीगार्ड त्यांचं रक्षण करतात. बच्चन कुठेही गेले की त्यांचे चाहते त्यांना गराडा घालतात, अशावेळी हे बॉडीगार्ड त्यांच्या चाहत्यांना आवरून बच्चन यांना पुढे जायला वाट मोकळी करून देतात. आपण कधी विचार केला आहे का की या बॉडीगार्डला पगार किती असेल? नक्कीच हा विचार तुमच्या मनात येऊन गेला असेलच. पण आम्ही या बातमीत अधिकृतरित्या माहिती देणार आहोत. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. तिच्यावरून नजरही हटेना; चिमुकल्या फॅनचाच फॅन झाला कार्तिक आयर्न अमिताभ बच्चन यांच्या पर्सनल बॉडीगार्डमध्ये अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेल्या मराठमोळ्या जितेंद्र शिंदेचं नाव घेतलं जातं. बच्चन यांच्यासोबत अनेक ठिकाणी जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) जातो. अनेक माध्यमांतील फोटोंमध्ये आणि व्हिडिओंमध्ये आपल्याला सफारी सूट घातलेला जितेंद्र दिसतो. या जितेंद्र शिंदेचा वर्षाचा पगार आहे तब्बल 1.5 कोटी रुपये. झालात ना अवाक्? हो तुम्ही बरोबर ऐकलंत. दीड कोटी रुपये वर्षाचा पगार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराचं संरक्षण करणाऱ्या बॉडीगार्डना (Protection of celebrity) त्याचा तसाच मोबदला दिला जातो. जितेंद्रची स्वत: ची सिक्युरिटी एजन्सीही आहे. पण बरेचदा तो स्वत: बच्चन यांच्यासोबत अनेक ठिकाणी जात असतो. बॉलिवूडमध्ये अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, शाहरुख खान आणि सलमान खान (Anushka Sharma, Deepika Padukone, Shah Rukh Khan and Salman Khan ) यांच्यासोबतही बॉडीगार्ड असतात आणि त्यांनाही जबरदस्त पगार दिला जातो. सलमानचा बॉडीगार्ड शेरा सगळ्यांना परिचित आहेच. Bigg Boss Marathi तिसरं पर्व IPL च्याच मुहूर्तावर; होस्ट मांजरेकरांचा लुक पाहा दुसरीकडे कामाबाबत बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट आता रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. रूमी जाफरीनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून इम्रान हाश्मी, रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूझा आणि अनू कपूर यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. त्याचबरोबर अयन मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्र’ या चित्रपटातूनही अमिताभ रसिकांच्या भेटीला येणार आहेत. या साय-फाय चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट प्रमुख भूमिकेत तर डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्कीनेनी, मौनी रॉय यांनीही भूमिका साकारल्या आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदीतील ‘झुंड’ चित्रपटातही अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका करत आहेत. ‘द इन्टर्न’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिवंगत ऋषी कपूर यांच्याऐवजी त्यांची भूमिका बच्चन साकारणार आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणही आहे.
First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment

पुढील बातम्या