मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय आहे 'डिनर'चा खरा अर्थ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय आहे 'डिनर'चा खरा अर्थ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मी माझ्या पोर्टफोलिया घेऊन फिल्ममेकरकडे जात असे तेव्हा ते मला म्हणायचे, अच्छा ठीक आहे. आपण डिनरला भेटू.

मी माझ्या पोर्टफोलिया घेऊन फिल्ममेकरकडे जात असे तेव्हा ते मला म्हणायचे, अच्छा ठीक आहे. आपण डिनरला भेटू.

मी माझ्या पोर्टफोलिया घेऊन फिल्ममेकरकडे जात असे तेव्हा ते मला म्हणायचे, अच्छा ठीक आहे. आपण डिनरला भेटू.

मुंबई, 8 मे : बॉलिवू़डमध्ये करिअर करणं म्हणजे दिसत तेवढं सोपं अजिबात नसतं. जर या ठिकाणी तुमचा कोणी गॉडफादर नसेल तर इथे आपलं वेगळं स्थान निर्माण करण तुम्हाला कठिण जात. अनेक चांगल्या वाइट अनुभवांना सामोरं जावं लागतं. अशात अनेक अभिनेत्रींचा कास्टिंग काउचचा अनुभव आल्याचं समोर आलं आहे. 'मी टू' प्रकरणानंतर अनेक अभिनेत्रींनी यावर मोकळेपणानं बोलायला सुरुवात केली. पण आता बॉलिवूडमधल्या डिनर या शब्दाच्या खऱ्या अर्थाबाबत धक्कादायक खुलासा एका अभिनेत्रीनं केला आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा काही काळापूर्वी रामगोपाल वर्मावर लावलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं फिल्म इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. तिनं सांगितलं की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमरची एक वेगळीच दुनिया आहे. जेव्हा शर्लिननं तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती तेव्हा एका फिल्म मेकरनं तिला अर्ध्या रात्री 'डिनर'साठी बोलवलं होतं.

रवीना टंडनला चाहत्यानं केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्रीनंही दिलं धम्माल उत्तर

शर्लिननं नुकतीच Koimoi या वेबसाइटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं अनेक धक्कादायक खुलासे केले. ती म्हणाली, जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं, त्यावेळी मला कोणीच ओळखत नव्हतं. मी सिनेमाच्या निर्मात्यांना अप्रोच करत असे की त्यांनी माझा अभिनय पाहावा. जो माझ्याकडे आहे असं मला वाटतं. मी माझ्या पोर्टफोलिया घेऊन त्यांच्याकडे जात असे तेव्हा ते मला म्हणायचे, अच्छा ठिक आहे. आपण डिनरला भेटू. मला वाटायचं की आपण नेहमी जसं डिनरला जातो तसं काही असेल पण तसं नव्हतं. मी जेव्हा त्यांना डिनरची वेळ विचार असे तेव्हा ते रात्री 11 किंवा 12 वाजताची वेळ देत असत.

शर्लिन पुढे म्हणाली, फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'डिनर'चा खरा अर्थ कॉम्प्रमाइज असा असतो. जेव्हा हे माझ्यासोबत चार-पाच वेळा घडलं तेव्हा मला समजलं की, याचा खरा अर्थ काय आहे. जेव्हा मला फिल्म मेकर्सचा उद्देश समजू लागला तेव्हा मी त्यांना नकार द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी निर्णय घेतला की, मला असं डिनर करणार नाही. त्यानंतर जेव्हाही मला कोणी डिनर बद्द विचारत असे त्याला मी नकार देत असे आणि सांगायचे, मी डिनर नाही करत, माझं डाएट सुरू आहे, ब्रेकफस्ट किंवा लंचसाठी बोलवा. यावर त्यांच्याकडून काहीच उत्तर येत नसे.

भाईजान पुन्हा एकदा ठरला देवदूत! आता भूकेल्यांसाठी अन्न पुरवणार अन्न, पाहा VIDEO

काही महिन्यांपूर्वी शर्लिन चोप्रानं फिल्ममेकर रामगोपाल वर्मावर गंभीर आरोप लावले होते. एका मुलाखतीत तिनं रामगोपाल वर्मानं तिला अडल्ट सिनेमात काम करण्याची ऑफर दिली होती. एवढंच नव्हे तर त्यानं तिला अश्लील व्हिडीओ सुद्धा पाठवल्याचं तिनं म्हटलं होतं. यासोबतच आऊट सायडर्ससोबत बॉलिवूडमध्ये खूप भेदभाव केला जात असल्याचंही तिनं म्हटलं होतं.

(संपादन- मेघा जेठे.)

ऋषी कपूर यांनी धडाक्यात लावलं होतं लेकीचं लग्न, असं पार पडलं कन्यादान

First published:
top videos

    Tags: Bollywood