Home /News /entertainment /

रवीना टंडनला वयाच्या 46 वर्षी चाहत्यानं केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्रीनंही दिलं धम्माल उत्तर

रवीना टंडनला वयाच्या 46 वर्षी चाहत्यानं केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्रीनंही दिलं धम्माल उत्तर

एका चाहत्यांनं 46 वर्षीय रवीनाला लग्नासाठी प्रपोज केलं आहे आणि विशेष म्हणजे तिनं सुद्धा यावर धम्माल उत्तर दिलं आहे.

    मुंबई, 8 मे : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊनमुळे सर्वांना आपापल्या घरी राहावं लागत आहे. अशात सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना आणि त्यांना घरी राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. सर्वच कलाकार सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री रवीना टंडन. सध्या रवीना सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे कारण एका चाहत्यांनं 46 वर्षीय रवीनाला लग्नासाठी प्रपोज केलं आहे आणि विशेष म्हणजे तिनं सुद्धा यावर धम्माल उत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच रवीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या एका व्हेकेशनचा आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, जेव्हा उन्हाळा सहन होत नाही तेव्हा माझं मन एखद्या हिल्स स्टेशनवर व्हेकेशनला जाण्याची स्वप्न बघू लागतं. रवीनाच्या या फोटोवरच तिला तिच्या एका चाहत्यानं लग्नासाठी प्रपोज केलं आहे. या चाहत्यानं लिहिलं, रवीना मॅम पुढच्या जूनमध्ये तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? चाहत्याच्या या कमेंटवर रवीनानं खूप मजेशीर उत्तर दिलं आहे. कधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण... आपल्या चाहत्याच्या कमेंटवर रिप्लाय करताना रवीनानं लिहिलं, सॉरी यार पुढच्या 7 जन्मांसाठी मी आधीच बुक झाले आहे. यासोबत तिनं हसणारा इमोजी सुद्धा पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर रवीनाच्या या मजेदार अंदाजाचं खूप कौतुक केलं जात आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या मजेदार कमेंट सुद्धा पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनमध्ये रवीना इतर बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेच आपल्या घरी राहून त्याचं काटेकोर पालन करत आहे. सध्या ती तिच्या फॅमिलीसोबत क्विलिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. यासोबतचती कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसत आहे. (संपादन- मेघा जेठे.) संजय दत्त ते शाहरुख खान... दारूच्या नशेमुळे वादात अडकले होते हे बॉलिवूड स्टार्स 'रामायण' हा सर्वाधिक पाहिलेला शो नाही? सर्वात मोठा रेकॉर्ड वादाच्या भोवऱ्यात
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Raveena tandon

    पुढील बातम्या