मुंबई, 13 जानेवारी : ‘बिग बॉस 16’ हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. बिग बॉसचा हा सीझन त्याच्या वेगळेपणामुळे चांगलाच गाजत आहे. या सीझनमध्ये नियम काहीसे बदलण्यात आले असून सिझन सुरु होऊन बरेच दिवस झाले असले तरी काहीच जण घराबाहेर गेले आहेत. गेल्या आठवड्यातही कोणालाही बेघर करण्यात आले नाही. पण या आठवड्यात चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण या आठवड्यात एक दोन नाही तर तब्बल तीन नॉमिनेशन होणार आहेत. आता घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. श्रीजीता डे ला बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच साजिद खान आणि अब्दू रोजिक यांनाही घरातून बाहेर काढण्यात येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हेही वाचा - Bigg Boss 16: बिग बॉस 16 च्या फिनालेमधून सलमान खानची एक्झिट?; हा सेलिब्रिटी घेणार भाईजानची जागा मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आठवड्यात तीन स्पर्धकांचे एलिमिनेशन होणार असून हे स्पर्धक घराबाहेर जाणार आहेत. श्रीजीता डे हिचं नाव प्रामुख्याने समोर आलं असून दुसऱ्या दोन स्पर्धकांमधये साजिद खान आणि अब्दू रोजिक यांची नावं आहेत. यामध्ये. वाईल्ड कार्ड स्पर्धक श्रीजीता डे कमी मतांमुळे या आठवड्यातघराबाहेर जाईल. तसेच साजिद खानचा करारही आता संपणार असून तोही शोमधून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्यासोबत अब्दु रोजिकही बिग बॉसला अलविदा करणार आहे. मात्र याबाबत अजून चॅनेलकडून दुजोरा मिळाला नसून ‘बिग बॉस’शी संबंधित सर्व अपडेट्स देणाऱ्या ‘द खबरी’ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा दावा केला आहे.
‘द खबरी’नेच साजिद खान विषयी दावा केला होता की साजिद खानचा निर्मात्यांशी करार आहे. यामध्ये साजिद खानला ‘बिग बॉस 16’ मध्ये राहण्यासाठी 15 जानेवारी 2023 पर्यंत किमान हमी देण्यात आली आहे. म्हणजे 15 जानेवारीपर्यंत बिग बॉसच्या घरातून साजिद खानला कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढले जाऊ शकत नाही. यामुळेच आतापर्यंत ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांनी प्रत्येक वेळी साजिद खानला एलिमिनेशनपासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे आता मात्र त्याचा करार संपणार असून साजिद खान या आठवड्यात घराबाहेर जाणार आहे. अब्दु रोजिकबद्दल सांगायचे तर, त्याला देशभरातून भरभरून प्रेम मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अब्दू काही कामानिमित्त शोमधून बाहेर पडला आणि नंतर परत आला. पण जेव्हा त्याने पुन्हा प्रवेश केला तेव्हा कामाच्या कमिटमेंट्समुळे तो शोमध्ये जास्त काळ येणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच आता त्यालाही याच आठवड्यात बाहेर काढण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे. या बातमीने अब्दुच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसू शकतो.
या संपूर्ण आठवड्याच्या एपिसोडबद्दल बोलायचे झाले तर शोमध्ये फॅमिली वीक सुरू होता. शिव ठाकरेच्या आईपासून ते प्रियंका चहर चौधरी यांचे भाऊ घरी आले. शेवटच्या एपिसोडमध्ये सुंबुलचे वडील, श्रीजिताची मंगेतर आणि सौंदर्याच्या आईने एंट्री घेतली. घरात एक कॅप्टनसी टास्कही होता, ज्यात शिव ठाकरे सर्वांना पराभूत करून कॅप्टन झाला आहे.