बॉलिवूड सेलिब्रेटीबद्दल खास गोष्ट ही आहे की पदार्पणनंतर त्यांच्या स्टारडममध्ये सातत्यानं वाढ होत जाते मात्र जसे ते सिनेमांपासून दूर जातात तशी त्यांच्या स्टारडमला उतरती कळा लागते.
2/ 7
मात्र बॉलिवूड अभिनेत्री मनिषा लांबाच्या बाबतीत मात्र असं काहीही झालेलं नाही. लग्नानंतर सिनेमांपासून दूर असलेली मनिषा सोशल मीडियावर मात्र बरीच सक्रिय आहे.
3/ 7
मनिषा नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे हॉट आणि ग्लॅमसर फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
4/ 7
हे फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की, सिनेमांपासून दूर असूनही मनिषा तिच्या फिटनेस बरीच काळजी घेते. या सर्व फोटोंमध्ये तिचा फिटनेस लक्षात येतो.
5/ 7
मनिषा लांबा 2008 मध्ये आलेल्या रणबीर कपूरच्या बचना ए हसिनोंमध्ये दिसली होती. या सिनेमातील या दोघांच्या जोडीला बरीच वाहवा मिळाली होती.
6/ 7
2005 मध्ये आलेल्या ‘यहाँ’ या सिनेमातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंबी बरंच कौतुक झालं.
7/ 7
2015 मध्ये सिनेमातून ब्रेक घेऊन मनिषा तिचा बॉयफ्रेंड रेयान थमसोबत विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिनं कोणत्याही सिनेमात काम केलेलं नाही.