Home /News /entertainment /

हिंदी चित्रपसृष्टी गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

हिंदी चित्रपसृष्टी गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

राजकपूर, दिलीपकुमार, देवानंद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.

    मुंबई 25 मार्च :  हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं आज निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या. सांताक्रूजला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1950-60चं दशक त्यांनी गाजवलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत नीट नव्हती. अखेर आज त्यांचं निधन झालं. उडन खटोला, मेरे मेहबूब, दाग, अमर, बरसात हे गाजलेले सिनेमे होते. राज कपूर यांनी त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक दिला त्यामुळे त्यांना राज कपूर यांनी शोधलेली अभिनेत्री असंही म्हटलं जातं. नवाब बानो असं त्यांचं मुळ नावं होतं. मात्र त्या निम्मी या नावानेच ओळखल्या जात होत्या. राजकपूर, दिलीपकुमार, देवानंद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Bollywood actress

    पुढील बातम्या