कपूर घराण्याच्या हिरोवर आली होती अशी वेळ की, कार विकून चालवावा लागला खर्च

कपूर घराण्याच्या हिरोवर आली होती अशी वेळ की, कार विकून चालवावा लागला खर्च

या अभिनेत्याच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली होती की त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली होती.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या घराण्यात जन्माला आलेले अभिनेता शशी कपूर यांचा आज वाढदिवस. 18 मार्च 1938 ला जन्मलेले शशी कपूर कधी काळी लाखो लोकांच्या मनावर राज्य करत होते. शशी कपूर यांनी जवळपास 100 सिनेमांमध्ये काम केलं आणि त्यातील बरेच सिनेमे हिट झाले. 1998 मध्ये आलेला साइड स्ट्रीट हा त्यांचा शेवटचा सिनेमा. या सिनेमात त्यांनी शबाना आझमी यांच्यासोबत काम केलं होतं. 4 डिसेंबर 2017 मध्ये शशी कपूर यांनी शेवटचा श्वास घेतला. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

एकीकडे आपल्या हिट सिनेमांमुळे सुपरस्टार झालेले शशी कपूर काही सिनेमांमुळे मात्र वादात सुद्धा सापडले होते. शशी कपूर यांच्या वादग्रस्त सिनेमांमध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते कोनरॉट रूक्स यांच्या ‘सिद्धार्थ’ सिनेमाचं. या सिनेमात काही वादग्रस्त सीन होते आणि सिनेमाची मुख्य नायिका सिमी ग्रेवाल आणि शशी कपूर यांनी हे सीन खूपच बोल्ड शूट केले होते.

VIDEO: हात धुताय ना? सचिन तेंडुलकरनंतर दीपिकाने घेतलं सेफ हॅण्ड्स चॅलेंज

शशी कपूर आणि सिमी ग्रेवल यांचा हा सिनेमा फक्त इंग्रजी भाषेत रिलीज झाला. यासिनेमातील एक सीनमध्ये सिमी ग्रेवल न्यूड होती आणि शशी कपूर यांना तिच्यासमोर हात जोडून उभं राहायचं होतं. हा सीन 2 इंग्रजी मासिकांच्या कव्हर पेजवर छापून आला. ज्यावर बरेच वाद झाले. एवढंच नाही तर हे प्रकरण पुढे कोर्टात गेलं. या सिनेमात न्यूड सीन देऊन सिमी ग्रेवल खूप चर्चेत आली होती.

OMG! अल्बम रिलीजआधीच प्रसिद्ध गायिका लेडी गागानं केलं न्यूड फोटोशूट

शशी कपूर यांच्या अगोदर अशाप्रकारचा सीन बॉलिवूडमध्ये कोणीच केला नव्हता. ही पहिलीच वेळ होती. या सीनमुळे हा सिनेमा भारतात रिलीज होऊ शकला नाही. कालांतराने शशी कपूर यांनी सिनेमात काम करणं बंद तेव्हापासून ते लाइम लाइटपासून दूर राहू लागले. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली होती की त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली होती. याचा खुलासा त्यांचा मुलगा कुणाल कपूरनं एका मुलाखतीत केला होता.

कुणालनं सांगितलं, 60 च्या दशकात शशी कपूर यांना सिनेमात काम मिळणं जवळजवळ बंद झालं होतं. त्यावेळी त्यांनी त्यांची आवडीची स्पोर्ट्स कार विकली होती. एवढंच नाही तर शशी कपूर यांची पत्नी जेनिफरनं पैशांसाठी स्वतःचं सामान सुद्धा विकलं होतं. त्यावेळी परिस्थिती एवढी बिघडली होती की एकेकाळी त्याच्यासोबत काम करण्याची स्वप्न पाहणाऱ्या अभिनेत्री सुद्धा त्यांच्यासोबत काम करण्यास नकार देत होत्या. पण त्यानंतर दिग्दर्शक नंदा यांनी शशी यांना घेऊन ‘फूल खिले’ तयार केला. जो सुपरहिट ठरला.

बिग बींची 'कोरोना-फिरोना' मराठीत, सुनिल बर्वेच्या आवाजातली ही कविता ऐकलीत का?

First published: March 18, 2020, 8:45 AM IST

ताज्या बातम्या