VIDEO: हात धुताय ना? धुवायलाच पाहिजे, सचिन तेंडुलकरनंतर दीपिकाने घेतलं सेफ हॅण्ड्स चॅलेंज

VIDEO: हात धुताय ना? धुवायलाच पाहिजे, सचिन तेंडुलकरनंतर दीपिकाने घेतलं सेफ हॅण्ड्स चॅलेंज

साबण स्लो नाहीये, पण कोरोनाला भारतातून पळवायचंय...म्हणून हात स्वच्छ धुवा

  • Share this:

मुंबई, 17 मार्च : सध्या देशभरात कोरोनाचा (Coronvirus) फैलाव वाढत असताना नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यायला हवं. याबाबत राज्य सरकारकडून वेळोवेळी नियमावली जाहीर केली जात आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारही जनतेला स्वच्छतेचं महत्त्व व कोरोनाचा (Covid - 19) फैलाव रोखण्यासाठी आवश्यक बाबींचं पालन करण्याचं आवाहन विविध पद्धतीनं करीत आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी साबणाचा वापर करुन स्वच्छ हात धुणं किंवा सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या ट्विटरवर कलाकारांना 'सेफ हॅण्ड्स चॅलेंज' दिल जात आहे. यामध्ये कलाकार साबणाने हात धुण्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करीत आहेत.

संबंधित - नावात काय आहे? पण 'कोरोना' नाव असण्याचा झाला या दुकानाला फायदा

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सतत साबणाने स्वच्छ हात धुणं किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी हे सेफ हॅण्ड्स चॅलेंज दिलं जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हात धुतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम) शेअर केला आहे.  नंतर दीपिका पादुकोनने देखील शेअर केला हात धुण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हात फक्त पाण्याने न धुता साबणाचा वापर करायला हवा. याशिवाय किमान 20 सेकंद हात धुवायला हवा आणि कोरड्या टॉवेलने स्वच्छ करणं गरजेचं असल्याचे सचिनने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोन हिनेही एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. तोंडाला मास्क लावलेल्या दीपिकाने सेफ हॅण्ड्स चॅलेंज स्वीकारलं आहे.

कलाकारांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोक फॉलोही करतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून जिम, मॉल्स आणि चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. यामुळे अभिनेत्री  कतरिना कैफ हिने इमारतीच्या गच्चीवर व्यायाम करीत असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

संबंधित - Coronavirus मुळे मुंबईत जिम बंद, जॅकलिननं शेअर केले HOT योगा व्हिडीओ

First published: March 17, 2020, 9:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading