मुंबई, 17 मार्च : जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसनं मनोरंजनसृष्टीला सुद्धा धडक दिली. काही हॉलिवूड कलाकारांना या व्हायरस लागण झाली आहे. अद्याप कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला याची लागण झाली नसली तरीही बॉलिवूड कोरोनाचा वेगळाच प्रभाव पडलेला पाहायला मिळत आहे. कोणी बॉलिवूडच्या गाण्यांवर कोरोना व्हर्जन तयार केली तर कोणी कविता. काही दिवसांपूर्वीच बिग बी अमिताभ बच्चन यांनीही एक कविता शेअर केली. ज्याचं मराठी व्हर्जन अभिनेता सुनिल बर्वेन सादर केलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी भोजपुरी भाषेत कोरोना व्हायरसवर एक कविता लिहिली होती. त्याचा व्हिडीओ त्यांनी त्याच्या ट्विटरवरुन शेअर केला होता. आता याच कवितेचं मराठी भाषांतर करुन मराठमोळा अभिनेता सुनिल बर्वेनं ही कविता सादर केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कोरोनापेक्षा TRP वर प्रेम, ‘तारक मेहता’च्या निर्मात्याने केली अजब मागणी
अमिताभ बच्चन यांनी केलेली करोना-फिरोना ही कविता आठवली का? याच कवितेचं मराठी रुपांतर अभिनेता सुनील बर्वे @BarveSunil यांनी केलंय आणि ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं. @SrBachchan @News18lokmat @MaheshMhatre #coronavirus pic.twitter.com/ErJZUoH1sV
— Neelima Kulkarni (@starneelima) March 17, 2020
अभिनेता सुनिल बर्वे सध्या स्टार प्रवाहच्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत काम करत आहे. त्याच्या आधी अभिनेत्री अमृता सुभाष हीने सुद्धा एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यातती एक प्रार्थना म्हणताना दिसली होती आणि यासोबतच तिनं सर्वांना आपापली काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हायरस बाबत काळजी घ्या अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात प्रियांका चोप्रा, सलमान खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, सुबोध भावे, मिथिला पालकर, स्वप्नील जोशी इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. या व्हायरसमुळे अनेक सिनेमांचे शो रद्द झाले आहे. जे पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत. तर काही सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अरे देवा आणखी एक कोरोना साँग! शाहरुखच्या ‘सुनो ना…‘चं नवं व्हर्जन, पाहा VIDEO चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरली आहे. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये सतत नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटली आणि इराणमध्येही दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे चीन आणि इटलीमधील परिस्थिती सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. दिलीप कुमार यांना Coronavirus ची लागण? आयसोलशनमध्ये ठेवल्याचा ट्विटरवरून खुलासा