शशांक केतकरनं घेतली ‘पिशवीवाल्या’ आजोबांची भेट, शेअर केली जोशी दाम्पत्याची माहीत नसलेली गोष्ट

शशांक केतकरनं घेतली ‘पिशवीवाल्या’ आजोबांची भेट, शेअर केली जोशी दाम्पत्याची माहीत नसलेली गोष्ट

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डोंबिवलीच्या एका आजोबांबद्दल एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डोंबिवलीच्या एका आजोबांबद्दल एक पोस्ट खूप व्हायरल झाली होती. हे आजोबा डोंबिवलीतील गावदेवी मंदिराकडे बसून पिशव्या विकतात. त्यांच्याकडून किमान दोन पिशव्या तरी विकत घ्याव्यात अशा आशयाची ही पोस्ट मराठमोळा अभिनेता शशांक केतकरनंही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली होती. पण त्यावेळी त्यानं या माहितीचा पाठपुरावा केला नसल्याचं सुद्धा म्हटलं होतं. मात्र शशांकनं स्वतः या आजोबांच्या डोंबिवलीतल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि समोर आला तो जोशी दाम्पत्याचा थक्क करणारा प्रवास आणि या वयातील दांडगा उत्साह...

शशांकनं त्याच्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हायरल पोस्ट शेअर केली होती आणि ही पोस्ट होती डोंबिवलीच्या जोशी आजोबांची. शशांकनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, सकाळी सकाळी हा फोटो बघून भरून आेलं.. वाईट वाटलं, आनंद झाला, राग आला पण सरते शेवटी या जगात आपण आलो आहोत तर जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी काहीतरी काम करत राहण्याशिवाय पर्याय नाही हेही realise झालं. माहिती चा पाठपुरावा केला नाहीये पण तरीही share करतो आहे.

हृतिकबाबत रंगोलीचा मोठा खुलासा; फोटो शेअर करुन म्हणाली, ‘कधीकाळी मला...’

'हे जोशी आजोबा, वय वर्ष 87, हे आजोबा गाद्यांच्या दुकानातून पडदा, सोफा यांच्या कव्हरचे उरलेले तुकडे दुकानदारांकडून विकत घेऊन कापडी पिशव्या स्वतः घरीच शिवतात. उदरनिर्वाहासाठी याही वयात त्यांना हे करावे लागते.... 40 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आजोबांकडे पिशव्या आहेत.आजोबा दर सोमवारी डोंबिवलीच्या गावदेवी मंदिरासमोर आणि गुरुवारी फडके रोड वर बसतात .....ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून एक/दोन पिशव्या तरी जरूर घ्या....’

शशांकनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्या खाली आलेल्या कमेंटमध्ये अनेकांनी या आजोबांबद्दल माहिती दिली होती. ज्यामुळे न राहावून आपण या आजोबांची भेट घेतल्याचं शशांक सांगतो. यावेळी शशांकनं केवळ आजोबाच नाही तर जोशी आजींसोबतही खूप गप्पा मारल्या.

अश्लील गाण्यात घेतलं महात्मा गांधीजींचं नाव, अभिनेत्री विरोधात FIR दाखल

यावेळी आजोबांनी मी माझ्या आनंदासाठी आणि हातपाय मोकळे राहावे यासाठी हे काम करतो. माझ्या घरची परिस्थिती अतिशय सधन आहे आणि मला कशाचीही कमी नाही हेही सांगितलं. फक्त आजोबाच नाही तर जोशी आजी पुरणपोळ्या आणि जेवण्याच्या ऑर्डर घेतात आणि लोकांना पुरवतात. ही माहिती सुद्धा नव्यानं समोर आली. या भेटीचा व्हिडीओ शशांकनं त्याच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.

वयाच्या 60 व्या वर्षी ही अभिनेत्री खेळतेय टेनिस, VIDEO पाहून व्हाल थक्क

First published: March 18, 2020, 3:15 PM IST

ताज्या बातम्या