जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वयाच्या 60 व्या वर्षी ही अभिनेत्री खेळतेय टेनिस, VIDEO पाहून व्हाल थक्क

वयाच्या 60 व्या वर्षी ही अभिनेत्री खेळतेय टेनिस, VIDEO पाहून व्हाल थक्क

वयाच्या 60 व्या वर्षी ही अभिनेत्री खेळतेय टेनिस, VIDEO पाहून व्हाल थक्क

बॉलिवूडची हीअभिनेत्री वाढत्या वयातही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. एवढंच नाही तर तिचा फिटनेस सुद्धा सर्वांनाच लाजवेल असा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मार्च : बॉलिवूडचे सर्वच कलाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर करत असतात. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री वाढत्या वयातही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. एवढंच नाही तर तिचा फिटनेस सुद्धा सर्वांनाच लाजवेल असा आहे. शॉर्ट ड्रेस पासून ते बोल्ड विधानांपर्यंत सर्वच गोष्टींमुळे ही अभिनेत्री नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. ही अभिनेत्री आहे नीना गुप्ता. तिनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सगळीकडे व्हायरल होत आहे. नीना गुप्ता बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रीपैकी एक आहेत ज्या काही ना काही कारणानं सतत चर्चेत असतात. या वयातही आपल्या अभिनयानं कोणत्याही सिनेमात वेगळी छाप सोडणाऱ्या नीना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सुद्धा तेवढ्याच चर्चेत असतात. त्यांची प्रत्येक पोस्ट सोशलम मीडियावर व्हायरल होताना दिसते. आताही अशीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. ज्यात त्या टेनिस खेळताना दिसत आहेत. कपूर घराण्याच्या हिरोवर आली होती अशी वेळ की, कार विकून चालवावा लागला खर्च

जाहिरात

नीना गुप्ता यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ शेर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, अनेक वर्षांनंतर आज टेनिस खेळले. खूप मज्जा आली. पण उद्या मात्र मला याचे परिणाम दिसणार आहे. या व्हिडीओमध्ये त्या बऱ्याच सफाईदारपणे खेळताना दिसत आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी टेनिस खेळणं नक्की त्यांचा फिटनेस दाखवून देतं. VIDEO: हात धुताय ना? सचिन तेंडुलकरनंतर दीपिकाने घेतलं सेफ हॅण्ड्स चॅलेंज

नीना गुप्ता मागच्या बऱ्याच वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. 2018 मध्ये आलेल्या आयुष्मान खुरानाच्या बधाई हो या सिनेमातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांवर सोडली होती. याशिवाय त्यांनी अलिकडच्या काळात पंगा आणि शुभमंगल ज्यादा सावधान या सिनेमांत काम केलं. ज्यातील त्यांच्या अभिनयचं खूप कौतुकही झालं होतं. OMG! अल्बम रिलीजआधीच प्रसिद्ध गायिका लेडी गागानं केलं न्यूड फोटोशूट मागच्या काही काळापासून नीना त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते. त्यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच त्या लवकर दीपिका-रणवीरच्या 83 सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा 1983 मध्ये भारतानं मिळवलेल्या वर्ल्डकप विजयावर आधारित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात