मुंबई, 18 मार्च : आपल्या गाण्यात महात्मा गांधीजींचं नाव घेणं एका अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. झारखंडची राजधानी रांची येथे झालेल्या कार्यक्रमात एका अश्लील गाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नावाचा वापर केल्यानं भोजपुरी अभिनेत्री आणि गायिका अंतरा सिंह प्रियांकाच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. छोटानागपुर खादी ग्राम उद्योगनं याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
तक्रारीमध्ये या प्रियांकाच्या या गाण्याला फक्त अश्लीलच म्हटलेलं नाही तर या गाण्यात तिनं महात्मा गांधीजींचं नाव चुकीच्या पद्धतीनं वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादींचं म्हणणं आहे की, प्रियांकानं या गाण्यातून देशाच्या महापुरुषाचा अपमान केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. प्रियांकानं अनेक हिट भोजपुरी गाणी गायली आहेत. पण आता या प्रकणात तिचं नावं आल्यानं तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शिल्पा शेट्टीनं लगावली नवऱ्याच्या कानशिलात; म्हणाली, ‘लायकीत राहा...’
काही दिवसांपूर्वी प्रियांका तिच्या बुलाती हैं मगर जाने का नहीं या गाण्यामुळे खूपच चर्चेत आली होती. उर्दूमधील प्रसिदध शायर राहत इंदौरी यांचा शेर ‘बुलाती हैं मगर जाने का नहीं’चं साँग व्हर्जन सगळीकडे खूप व्हायरल झालं होतं. या शायरीवर भोजपुरी गायिकांनी गाणं गायलं होतं. ज्याला खूपच लोकप्रियता मिळाली होती.
कपूर घराण्याच्या हिरोवर आली होती अशी वेळ की, कार विकून चालवावा लागला खर्च
VIDEO: हात धुताय ना? सचिन तेंडुलकरनंतर दीपिकाने घेतलं सेफ हॅण्ड्स चॅलेंज