मुंबई, 18 मार्च : कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या बॉलिवूड स्टारवर टीका करताना दिसते. अशाच कंगना रणौत आणि हृतिक रोशन हा वाद नेटकऱ्यांसाठी नवीन नाही. रंगोलीनं अनेकदा ट्वीटरवरुन हृतिकवर टीका केलेली आहे. एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी रोशन कुटुंबीय त्यांच्या मुलीला मारहाण करत असल्याचा आरोपही कंगना आणि रंगोलीनं केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रंगोलीनं तिच्या ट्विटरवर हृतिकसोबतचा फोटो शेअर करत नवा खुलासा केला आहे.
रंगोली चंडेल नुकताच तिच्या ट्विटरवर हृतिकसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यात ती हृतिक हसत हसत तिच्यासोबत पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रंगोलीनं लिहिलं, ‘हा पाहा पप्पूजी, कधी काळी दिवसभर मला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असे. माझ्या बहिणीच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी आणि आज म्हणतो हम आपके हैं कौन...’ रंगोलीचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
वयाच्या 60 व्या वर्षी ही अभिनेत्री खेळतेय टेनिस, VIDEO पाहून व्हाल थक्क
Yeh dekho Pappu ji, sara din mujhe impress karne mein laga rehta tha taki meri bahen ki good books mein aa jaye, aur aaj kehta hai hum aapke hain kaun pic.twitter.com/KLj7Gc0YYo
— Rangoli Chandel (@Rangoli_A) March 17, 2020
काही काळापूर्वी कंगना रणौत आणि हृतिक यांच्यातील वाद सोशल मीडियामुळेच सर्वांसमोर आला होता. दोघंही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते असा अंदाज लावला गेला होता. एवढंच नाही तर या दोघांमध्ये जवळीक वाढल्यामुळे हृतिक सुझान यांचा घटस्फोट झाला असंही म्हटलं जातं. सुझाननं या गोष्टीला नकार दिला असला तरी एक मुलाखतीत कंगनानं हृतिकला मुर्ख एक्स म्हटलं होतं.
शिल्पा शेट्टीनं लगावली नवऱ्याच्या कानशिलात; म्हणाली, ‘लायकीत राहा...’
कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिनं सुद्धा या प्रकरणानंतर अनेकदा ट्विटरवरुन हृतिकवर निशाणा साधला होता. काही दिवसांपूर्वी रंगोलीनं नेहा धुपियाच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही ट्वीट केलं होतं आणि त्यासोबतच नेहाला पाठिंबा देणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिला सुद्धा ट्विटरवर झापलं होतं. कंगानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच थलायवी आणि धाकड या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कपूर घराण्याच्या हिरोवर आली होती अशी वेळ की, कार विकून चालवावा लागला खर्च