Home /News /entertainment /

दिलीप कुमार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलं होतं भाषण; गांधीवाले म्हणत टाकलं होतं तुरुंगात

दिलीप कुमार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलं होतं भाषण; गांधीवाले म्हणत टाकलं होतं तुरुंगात

स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांविरुद्ध भाषण केल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. पाहूया काय होता तो थक्क करणारा किस्सा...

    मुंबई 7 जुलै: दिलीप कुमार (Dilip Kumar) हे भारतातील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार हे उत्तम अभिनेताच नव्हते तर सामाजिक कार्यकर्ता देखील होते. (Dilip Kumar Throwback Story) स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांविरुद्ध भाषण केल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. पाहूया काय होता तो थक्क करणारा किस्सा... पाकिस्तानने राखला दिलीप कुमारांचा मान; बालपणीचा ठेवा कायमस्वरूपी जपला 1940 साली त्यांचं वडिलांसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. परिणामी ते मुंबई सोडून पुण्यात राहायला गेले. तिथे ते एका आर्मीच्या कॅन्टिनमध्ये सँडविच विकायचं काम करत होते. त्यांचं इंग्रजी उत्तम होतं त्यामुळे त्यांच्या स्टॉलजवळ चांगलीच गर्दी व्हायची. एके दिवशी याच स्टॉलवर उभं राहून त्यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार भाषण केलं होतं. इंग्रज कशा प्रकारे आपलं शोषण करतात, आपण त्यांना आपल्या देशातून बाहेर काढायला हवं असं म्हणत त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या. सत्यजीत रे दिलीप कुमारांना का म्हणायचे मेथड किंग? पाहा काय आहे गंमतीशीर किस्सा या भाषणामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यांना पुण्यातील येरवडा तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. या ठिकाणी अनेक क्रांतीकारक देखील होते. त्यावेळी या क्रांतीकारकांना गांधीवाले म्हणायचे. दिलीप कुमार यांना देखील तुरुंगात पोलीस अधिकारी गांधीवाले अशी हाक मारयचे. ही हाक ऐकून त्यांना स्वत:बद्दल गर्व वाटायचा. हा किस्सा त्यांनी 'दिलीप कुमार - द सब्सटांस अँड द शॅडो' या पुस्तकात लिहिला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Actor, Dilip kumar, Entertainment

    पुढील बातम्या