मुंबई, 26 मार्च: राजकारण आणि बॉलिवूड यांचं नातं काही नवीन नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातीलही अनेकांचे बॉलिवूडकरांशी मैत्रिपूर्ण संबंध (Bollywood and Politics) आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल (Social Media Photo Viral) होत आहे. ज्यामध्ये शरद पवार यांचे नातू आणि बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री दिसत आहे. शरद पवार हे राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तीमत्त्व आहे. दरम्यान त्यांच्या नातवाचा बॉलिवूड अभिनेत्रीबरोबरचा फोटो व्हायरल झाल्याने विशेष चर्चा होत आहे. शरद पवार यांचा नातू जय पवार आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Jay Pawar and Urvashi Rautela Photo Viral) यांचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो नेमका कधीचा आहे हे स्पष्ट होत नाही आहे. मात्र या फोटोमध्ये जय पवार आणि उर्वशी रौतेला या दोघांसह आणखी एक व्यक्ती दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, cine riser official या इन्स्टा पेजवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यांनी असा दावा केला होता की हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब याठिकाणचा आहे. त्यानंतर इतरही काही इन्स्टा पेजवरुन हा फोटो व्हायरल होत आहे.
दरम्यान हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जय पवार आणि उर्वशी रौतेला एकमेकांना डेट करत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आल्यास त्याविषयी अपडेट दिले जाईल. मात्र अद्याप अधिकृत अशी माहिती नाही. एखाद्या कार्यक्रमासाठी दोघे एका ठिकाणी स्पॉट झाल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. जय पवार हे शरद पवार यांचे नातू असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते पूत्र आहेत. जय हे सध्या बारामतीतील राजकारणात विशेष सक्रीय आहेत. सोशल मीडियावरही ते विशेष सक्रिय असतात. अजित पवार यांचे ज्येष्ठ पूत्र पार्थ पवार यांच्यासह राजकारणात काम करताना त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
उर्वशीबाबत बोलायचं झालं तर अलीकडेच ती मिस युनिव्हर्स पेजेंट 2021 मध्ये परीक्षक म्हणून होती. अरब सुपरस्टार मोहम्मद रमजान सोबतचे तिचं आंतरराष्ट्रीय गाणं ‘वर्सासे बेबी’ चांगलंच गाजलं आहे. लवकरच ती जिओ स्टुडिओच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’या वेब सीरिजमध्ये रणदीप हुडा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.